Bicholim market news Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market : आम्ही व्यवसाय करायचा की नाही? डिचोलीतील विक्रेत्यांची आर्त हाक; बाजार निरीक्षकांकडे कायमस्वरूपी जागेची मागणी

Bicholim Market vendors: बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी मिळून ५० हून अधिक स्थानिक विक्रेत्या बसून भाजी आदी वस्तू विक्रीचा धंदा करतात.

Sameer Panditrao

डिचोली: जागेवरुन आमची परवड चालूच असून, आम्हांला बाजारात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी डिचोलीच्या बाजारात बसून भाजी विकणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांनी केली आहे. ही मागणी पुढे करुन बाजारातील विक्रेत्यांनी बुधवारी डिचोली पालिकेकर धडक दिली.

नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी पालिकेत उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांची भेट झाली नाही, म्हणून बाजार निरीक्षकांच्या कानावर आपली कैफियत घालून या विक्रेत्या परतल्या. बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी मिळून ५० हून अधिक स्थानिक विक्रेत्या बसून भाजी आदी वस्तू विक्रीचा धंदा करतात. मात्र या विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा नसल्याने त्यांच्यासमोरील अडचण वाढली आहे. बऱ्याचदा या विक्रेत्यांना पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागते.

ग्राहक येतच नाही

बाजारातील गणपती पूजन मंडपात बसावे म्हटले, तर या मंडपात ग्राहक फिरकत नाहीत. मंडपाबाहेर बसावे, तर त्याठिकाणी वाहने पार्क करून ठेवतात. उन्हापासून बचाव म्हणून छत्री लावली, तर अन्य दुकानदार हरकत घेतात. अशी कैफियत दीक्षा माजीक, सुरेखा गावकर आदी विक्रेत्यांनी मांडून, आम्ही धंदा तरी कसा करावा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. विक्रेत्यांची एकाच ठिकाणी बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या विक्रेत्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

Goa News Live: ओपा प्रकल्पातील पंप अखेर सुरु, राजधानीला मिळणार पाणी

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

SCROLL FOR NEXT