chandrakant shetye premendra shet  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Issue: डिचोली खनिज वाहतूक वाद! तोडगा काढण्यासाठी दोन आमदार मैदानात, काय ठरली पुढची वाटचाल?

Chandrakant Shetye & Premendra Shet: शेतकरी आणि कपात केलेल्या कामगारांच्या मागणीसंदर्भात दोन दिवसांत सुवर्णमध्य काढण्यासाठी मध्यस्थी करण्यात येईल, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी स्पष्ट केले आहे.

Manish Jadhav

डिचोली: डिचोलीतील खनिज वाहतूक पूर्वपदावर आणून खाण व्यवसाय सुरळीतपणे सुरु व्हावा, तसेच शेतकरी आणि कपात केलेल्या कामगारांच्या मागणीसंदर्भात दोन दिवसांत सुवर्णमध्य काढण्यासाठी मध्यस्थी करण्यात येईल, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार महोदयांची ग्वाही

खनिज वाहतूक (Mineral Transport) बंदमुळे अस्वस्थ बनलेले कामगार तसेच आंदोलनकर्ते शेतकरी यांची स्वतंत्रपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर आमदार चंद्रकांत शेट्ये आणि डॉ. प्रेमेंद्र शेट यांनी संयुक्तपणे भूमिका स्पष्ट केली. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यासोबतच येत्या दोन दिवसात कंपनी व्यवस्थापन तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी आमदार महोदयांनी दिली.

माठवाडा-सारमानस जंक्शनजवळ शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याने सुमारे 11 दिवसांपासून डिचोलीतील वेदांता कंपनीच्या खाणीवरील खनिज वाहतूक बंद आहे. त्यामुळे खाण व्यवसायावर परिणाम झाला आहे. आमदार डॉ. शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी डिचोलीतील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

कामगारांनी व्यथा मांडली

खनिज वाहतूक बंद असल्यामुळे अस्वस्थ बनलेल्या 'वेदांता" च्या कामगारांनी (Workers) आज (शनिवारी) आमदार चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांची डिचोलीत भेट घेतली. यावेळी कामगारांनी आमदारांसमोर आपली व्यथा मांडली.

शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

गेल्या 11 दिवसांपासून रस्त्यावर उतरलेले आंदोलनकर्ते शेतकरी आणि कपात केलेल्या कामगारांनीही दोन्ही आमदारांची भेट घेऊन आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले. आमची शेती आम्हाला द्या. अन्यथा नुकसान भरपाई द्या, तसेच, कामावरुन काढलेल्या कामगारांना रुजू करुन घ्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT