Illegal Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतूकीविरोधात पिळगाववासीय आक्रमक; ‘वेदान्ता’चे ट्रक पुन्हा रोखले
Pilgaon Residents Stop Vedanta TrucksDainik Gomantak

Illegal Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतूकीविरोधात पिळगाववासीय आक्रमक; ‘वेदान्ता’चे ट्रक पुन्हा रोखले

Pilgaon Residents Stop Vedanta Trucks: खनिज वाहतुकीमुळे त्रस्त बनलेल्या पिळगाववासीयांनी अचानक आक्रमक पवित्रा घेताना मंगळवारी (22 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले.
Published on

डिचोली: खनिज वाहतुकीमुळे त्रस्त बनलेल्या पिळगाववासीयांनी अचानक आक्रमक पवित्रा घेताना मंगळवारी (22 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले. ‘एसओपी’चे उल्लंघन करुन खनिज वाहतूक होत असल्याच्या कारणावरुन रात्री पावणे आठच्या सुमारास पिळगाव येथे ‘वेदान्ता’चे खनिज वाहतूक करणारे ट्रक रोखण्याचा प्रकार घडला.

पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी यांच्या नेतृत्वाखाली संतप्त बनलेल्या पिळगाव येथील 25 हून अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरुन सारमानस-पिळगाव येथील नागरिकांनी जंक्शनवर पाच ते सहा ट्रक रोखून धरले.

सारमानस जेटीवर खनिज खाली करुन हे ट्रक परतत होते. त्याचवेळी लोकांनी रस्त्यावर उतरुन हे ट्रक अडवून धरले. काहीवेळ गोंधळ झाल्यानंतर ट्रक खाणीवरील रस्त्यावर बाजूला पार्क करण्यात आले.

Illegal Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतूकीविरोधात पिळगाववासीय आक्रमक; ‘वेदान्ता’चे ट्रक पुन्हा रोखले
Vedanta Mining Dispute: वेदान्‍ताच्‍या खाण खंदकाने उडवली झोप; मोठ्या प्रमाणात माती कोसळल्याची घटना

शेतकरी विरोधात

पिळगावमधील जनता नियमबाह्य खनिज वाहतुकीच्या विरोधात आहे. गेल्या वर्षभरात पिळगावमधील शेतकरी मिळून लोक खनिज वाहतुकीविरोधात चार ते पाचवेळा रस्त्यावर उतरले होते.

1) यापुढे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता खनिज वाहतूक करण्याचा प्रयत्न झाल्यास ट्रक अडविण्याचा इशारा सरपंच जल्मीसह संतप्त नागरिकांनी दिला. डिचोलीतील खाणीवरून पिळगावमार्गे सारमानस जेटीपर्यंत होणाऱ्या खनिज वाहतुकीचा मुद्दा गेल्या रविवारी (ता.20) झालेल्या पिळगावच्या ग्रामसभेत तापला होता.

2) खनिज वाहतूक करताना नियम पाळण्यात येत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. खनिज रस्त्यावर सांडत असल्याने पावसाच्यावेळी सारमानस येथे चिखल निर्माण होत आहे. तसेच या मातीने माखलेल्या रस्त्यावरून चालणेही कठीण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com