Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतुकीविरोधात सारमानसवासीय आक्रमक, पुन्हा रोखले ट्रक; एसओपी उल्लंघनाची तक्रार

Illegal Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतुकीमुळे त्रासलेल्या सारमानसवासीयांनी अचानक आक्रमक पवित्रा घेऊन आज (मंगळवारी) सायंकाळी उशिरा खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले.
Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतुकीविरोधात सारमानसवासीय आक्रमक,  पुन्हा रोखले ट्रक; एसओपी उल्लंघनाची तक्रार
Mineral TransportDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: अनिर्बंध खनिज वाहतुकीमुळे त्रासलेल्या सारमानसवासीयांनी अचानक आक्रमक पवित्रा घेऊन आज (मंगळवारी) सायंकाळी उशिरा खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले. ''एसओपी''चे उल्लंघन आणि त्यातच धूळ प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सारमानस येथे ''वेदांता''च्या जेटीकडील फाटकाजवळ खनिज वाहतूक करणारे पाच ट्रक रोखले.

ट्रक अडविण्यात येत असल्याची कुणकुण लागताच नंतर काही ट्रक माघारी फिरले, अशी माहिती मिळाली आहे. सारमानस जेटीवर खनिज खाली करण्यासाठी हे ट्रक जात होते. त्याचवेळी लोकांनी रस्त्यावर उतरून हे ट्रक अडवून धरले. जवळपास दोन तास हे ट्रक रोखून ठेवले होते.

Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतुकीविरोधात सारमानसवासीय आक्रमक,  पुन्हा रोखले ट्रक; एसओपी उल्लंघनाची तक्रार
Illegal Mineral Transport: अनिर्बंध खनिज वाहतूकीविरोधात पिळगाववासीय आक्रमक; ‘वेदान्ता’चे ट्रक पुन्हा रोखले

घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर संतप्त लोकांनी पोलिस अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती पटवून दिली. मात्र, कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी त्याठिकाणी फिरकला नाही. अधिकारी समोर येत नाहीत, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही,अशी भूमिका लोकांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत ट्रक रस्त्यावरच होते. यावेळी पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी यांच्यासह काही पंचसदस्य उपस्थित होते.

स्थानिक पंच तथा उपसरपंच सुनील वायंगणकर उपस्थित होते. मात्र त्यांनी कोणतीच स्पष्ट भूमिका मांडली नाही. दरम्यान, मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून खनिज वाहतूक सुरूच राहिली, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच मोहिनी जल्मी, माजी सरपंच महेश वळवईकर यांच्यासह संतप्त नागरिकांनी दिला आहे.

डिचोलीतील खाणीवरून खनिज वाहतूक करताना नियम पाळण्यात येत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. खनिज रस्त्यावर सांडत असतानाही वेळचेवेळी पाणी फवारून रस्ता साफ करण्यात येत नसल्याने सारमानस येथे धुळीचे प्रदूषण होत आहे. या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या येत आहेत ,अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

महिनाभरात तिसऱ्यांदा आंदोलन

पिळगावमार्गे सारमानस जेटीपर्यंत होणाऱ्या खनिज वाहतुकीचा मुद्दा गेल्या ऑक्टोबर महिन्यात (ता. २०) झालेल्या पिळगावच्या ग्रामसभेत तापला होता. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी खनिज वाहतुकीविरोधात रस्त्यावर उतरले होते. ‘एसओपी’चे उल्लंघन करून खनिज वाहतूक होत असल्याचे कारण पुढे करून सारमानस-पिळगाव जंक्शनवर खनिज वाहतूक करणारे ट्रक रोखले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात अनियंत्रित आणि ‘एसओपी’चे उल्लंघन करून खनिज वाहतूक करताना सारमानस-पिळगाव जंक्शनवरच ५० हून अधिक ट्रक रोखून धरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com