Bicholim Vathadev garbage issue Dainik Gomantak
गोवा

वाठादेव येथे कचऱ्यामुळे रस्ताच गायब! रोगराईची भीती; बगलमार्गावरील सेवा रस्ता झालाय ब्लॅक स्पॉट

Bicholim Vathadev garbage issue: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात काही भागात कचऱ्याची समस्या कायम असून वाठादेव भागात तर ही समस्या दिवसेंदिवस भयानक बनत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात काही भागात कचऱ्याची समस्या कायम असून वाठादेव भागात तर ही समस्या दिवसेंदिवस भयानक बनत आहे. वाठादेव येथे बगलमार्गाजवळील सेवा रस्त्यावर तर कचरा टाकण्याचे प्रकार फारच वाढले आहेत. या कचऱ्यामुळे सेवा रस्त्याचे अस्तित्व संकटात आले आहे.

वाठादेव येथील ओव्हरब्रीज जवळील सेवा रस्त्यावर तर सुक्या बरोबरच ओलाही कचरा टाकण्यात येत आहे. तसेच सॅनेटरी पॅडचा देखील खच पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

वाठादेव येथील सेवा रस्त्यावर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा पसरलेला आहे. कचऱ्यामुळे सेवा रस्ता चक्क गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या या सेवा रस्त्यावर प्रचंड प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे या रस्त्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या जवळपास एक वर्षापासून ही समस्या आहे, अशी माहिती अब्दुल रहीम या नागरिकाने दिली.

दंडात्मक कारवाई आवश्यक

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील कारापूर-तिस्क, कुळण, गोकुळवाडा, न्यूवाडा, वाठादेव सर्वण आदी भागात कचऱ्याची समस्या कायम आहे. कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध हॉट स्पॉटवर जाळी बसविण्याचा पंचायतीचा प्रयोग फसला आहे.

त्यामुळे रस्त्याच्या बाजूने कचरा फेकणाऱ्यांचे आयतेच फावले आहे. ''कचरा टाकू नका'' असा संदेश देणारे सूचना फलकही काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र त्याचाही फायदा होत नाही. कचरा समस्या नियंत्रणात आणायची असल्यास स्थानिक पंचायतीने कचरा फेकणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टीम इंडियाच्या पराभवानंतर 'हाय-व्होल्टेज ड्रामा'! हार्दिक-गौतमच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल Watch Video

ड्रग्जचा आता गोव्याच्या खेडेगावात शिरकाव; बेलारुसच्या महिलेला एक कोटी रुपयांच्या अमली पदार्थासह अटक

Goa vs Gujrat: गोव्याचा सलग दुसरा एकतर्फी विजय, गुजरातचा 4-0 गोलफरकाने फडशा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत, 'इंडिगो' प्रकरणानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण दक्ष

Goa Live Updates: पर्वरीतील एकाची 70 लाखांची फसवणूक, केरळमधील एकाला अटक

SCROLL FOR NEXT