Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Bicholim Murder: गेल्या १५ ऑक्टोबर रोजी म्हावळिंगे येथे तीन वर्षीय चिमुकली मुलीची तिच्याच आईच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण डिचोली तालुका हादरला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : सरते वर्ष हे डिचोली तालुक्यातील महिलांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरले. केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत डिचोली पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका तीन वर्षीय चिमुकलीसह दोन महिलांचा निर्दयीपणे खून करण्यात आला. तसेच एका अविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची नोंद आहे. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या शुक्रवारी मृतावस्थेत आढळून आलेल्या लक्ष्मी भिकाजी शिरोडकर या महिलेचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तिचा साथीदार रमेश तेली याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी न्यूवाडा-वाठादेव येथे रबिया हवंगी (वय २५) या विवाहित महिलेची दिवसाढवळ्या तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी पती मैनुद्दीन हवंगी याने गुन्ह्याची कबुली देत शरणागती पत्करली असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, २ डिसेंबर रोजी कारापूर येथील वासंती सालेलकर ही अविवाहित महिला राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली. शवविच्छेदन अहवालात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे नमूद असले तरी नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वासंतीच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत कारापूर ते डिचोली पोलिस स्थानकापर्यंत भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला होता.

चिमुकलीची निर्घृण हत्या

गेल्या १५ ऑक्टोबर रोजी म्हावळिंगे येथे तीन वर्षीय चिमुकली मुलीची तिच्याच आईच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण डिचोली तालुका हादरला होता. या प्रकरणी मुलीची आई नागम्मा रवी व्ही., तिचा प्रियकर नितीशकुमार पुजारा आणि अन्य एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पोटच्या गोळ्याच्या अमानुष हत्येने समाजमनाला जबर धक्का बसला. या सर्व घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍‍न पुन्हा ऐरणीवर आला असून, गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि जलद न्यायप्रक्रियेची मागणी जोर धरू लागली आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

सर्व प्रकरणांची जलद व पारदर्शक चौकशी

दोषींना कठोर शिक्षा व्‍हावी

महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा

संवेदनशील भागांत पोलिस गस्त वाढवणे

पाच महिन्यांतील प्रमुख घटना

२५ जुलै : रबिया हवंगी हिची तलवारीने हत्या (न्यूवाडा-वाठादेव)

१५ ऑक्टोबर : तीन वर्षीय चिमुकलीची हत्या (म्हावळिंगे)

०२ डिसेंबर : वासंती सालेलकर हिचा संशयास्पद मृत्यू (कारापूर)

२६ डिसेंबर : लक्ष्मी शिरोडकर हिचा खून; साथीदारास अटक (डिचोली)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: "आधी रणजी ट्रॉफीमध्ये मध्ये कोचिंग करा..." इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं गौतम गंभीरची उडवली खिल्ली!

Goa ZP Elections: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रेश्मा बांदोडकर आणि नामदेव च्यारी रिंगणात

APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी घडवला इतिहास; वाघशीर पाणबुडीतून केली सागरी सफर, पाहा Photo, Video

"माणसं पिंजऱ्यात आणि प्राणी मोकळे"! गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटचा ‘रिव्हर्स रोल-प्ले’; मांसाहाराविरुद्ध प्राणी मुक्ती मोर्चा

Dhalanche Mand: डिचोलीत फुलू लागलेत धालांचे मांड! लोकसंस्कृतीचे दर्शन; 'रंभा अवसर' प्रथेचे आकर्षण

SCROLL FOR NEXT