Mapusa Police Quarters Demolition Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police Quarters : म्हापसा पोलिस क्वार्टर्स पाडण्यास सुरुवात; बहुमजली इमारत बांधणार, 45-50 वर्षांच्या आठवणींना पूर्णविराम

Mapusa Police Quarters Demolition: जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र धावणाऱ्या पोलिस बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबाला वर्षानुवर्षे मायेची ऊब देणारे म्हापसा येथील पोलिस क्वार्टर्स अखेर इतिहासजमा होत आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र धावणाऱ्या पोलिस बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबाला वर्षानुवर्षे मायेची ऊब देणारे म्हापसा येथील पोलिस क्वार्टर्स अखेर इतिहासजमा होत आहेत. म्हापसा पोलिस स्थानकाच्या आवारातील जीर्ण होऊन मोडकळीस आलेल्या तिन्ही पोलिस निवासी गाळे इमारती जमीनदोस्त करण्याचे काम आज सोमवारपासून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाने हाती घेतले आहे.

आगामी १५ दिवसांत कंत्राटदाराकडून या तिन्ही इमारती पाडल्या जाणार आहेत. ४५-५० वर्षांचा इतिहास आणि आठवणींचा कोपरा पोलिस कर्मचाऱ्यांच्या विश्रांती आणि निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून १९७६ मध्ये पोलिस खात्याने म्हापसा पोलीस स्थानकाच्या आवारात दुमजली बॅरेक आणि ८ निवासी गाळे असलेली एक मजली दोन क्वार्टर्स इमारत उभारली होती. पुढे हे निवासी गाळे अपुरे ठरत असल्याने १९८२ मध्ये अजून एक ६ गाळे असलेली दुमजली इमारत बांधण्यात आली होती.

दिवसभर खाकी वर्दीत राहून कर्तव्य बजावल्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याला थकवा घालवण्यासाठी हक्काचे छत देणारा हाच तो कोपरा होता. गेल्या ४५-५० वर्षांपासून कित्येक पोलिस कुटुंबांच्या सुखा-दुःखाचा, सणासुदीचा आणि लहान मुलांच्या हसण्या-खेळण्याचा या इमारती साक्षीदार राहिल्या. इथेच अनेकांचे संसार फुलले आणि मुलांच्या बालपणीच्या आठवणी रुजल्या. सुरक्षेसाठी जड अंतःकरणाने सोडला आसरा मागील अनेक दशकांत या निवासी गाळ्यांच्या इमारतींची पुरेशी डागडुजी न झाल्याने त्या अत्यंत जीर्ण आणि धोकादायक बनल्या होत्या.

काही काळापूर्वी नवीन पोलीस स्थानकाचे भव्य बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सरकारने जुनी पोलिस बॅरेक इमारत पाडली होती. मात्र, उर्वरित तिन्ही निवासी गाळे इमारतींची अवस्था इतकी बिकट झाली होती की, आपल्या लाडक्या लेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी जड अंतःकरणाने हा मायेचा आसरा स्वतःहून रिकामी केला होता. तर उर्वरित एका इमारतीमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस खात्याने आदेश देऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते.

नवी पहाट उजाडणार!

आज जेव्हा अनेक वर्षे रिक्त आणि पडिक अवस्थेत असलेल्या या भिंतींवर बुलडोझर चालला, तेव्हा अनेक जुन्या आठवणी पोलिस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांसमोरून सरकल्या. परंतु, या दुःखासोबतच आता तिथे एक नवी पहाट उजाडणार आहे. या कारवाईनंतर रिक्त झालेल्या मोकळ्या जागेवर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अशा दोन नवीन बहुमजली इमारती उभारण्याची सरकारची योजना आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT