Sarmanas ferry Dainik Gomantak
गोवा

Sarmanas Ferry: 15 वर्षांपूर्वी बुडाली फेरीबोट, कार दुर्घटना; सारमानस फेरीधक्का बनतोय मृत्यूचा सापळा

Sarmanas Ferry Bicholim: कार थेट नदीत बुडण्याच्या कालच्या घटनेनंतर सारमानस फेरीधक्का पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तेथील पूर्वीच्या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: कार थेट नदीत बुडण्याच्या कालच्या घटनेनंतर सारमानस फेरीधक्का पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तेथील पूर्वीच्या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

सारमानस फेरीधक्का दिवसेंदिवस असुरक्षित आणि धोक्याचा बनत आहे. तेथील अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा, अशी स्थानिकांची मागणी आहे

दुसऱ्या बाजूने फेरीधक्क्यावर सुधारणा केली नाही तर फेरीसेवा रोखण्यात येईल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते संतोषकुमार सावंत यांनी दिला आहे. काल एक कार या फेरीधक्क्यावरून थेट नदीत बुडण्याची घटना घडली आहे.

नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत कारचालक सुदैवाने बचावला. पावणेदोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये याच फेरीधक्क्यावरून कार नदीत बुडाल्याने यतीन मयेकर या कारचालक युवकाचा दुर्दैवी अंत झाला होता.

या घटना आणि त्याच्या पूर्वीच्या दुर्दैवी घटना पाहता सारमानस फेरीधक्का असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंधरा वर्षांपूर्वी बुडाली होती फेरीबोट

पंधरा वर्षांपूर्वी सारमानस फेरीधक्क्याजवळ फेरीबोट बुडण्याची दुर्घटना घडली होती. टोंक फेरीधक्क्यावरून आलेली फेरीबोट सारमानस फेरीधक्क्याजवळ पोचता पोचता मांडवी नदीत बुडाली होती. या दुर्घटनेत फेरीबोटीमधील गोवेकर नामक माशेल येथील एका व्यावसायिकाला जलसमाधी मिळाली होती, तर अन्य काही प्रवासी मृत्यूच्या दाढेतून बचावले होते. फेरीबोट बुडाल्याने वाहनेही पाण्याखाली गेली होती. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली होती. शिवाय सारमानस फेरीधक्क्यावरुन काही वाहने पाण्यात जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

तातडीने उपाययोजना करा

फेरीबोटीत प्रवेश मिळवण्यासाठी वाहनचालकांमध्ये शर्यत लागते. फेरीधक्क्याकडे जाताना एखादेवेळी वाहनाचा ब्रेक निकामी झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठी सारमानस बसथांब्यापासून फेरीधक्क्यापर्यंतची उतरणी कापून रस्ता सपाट करावा. त्याचबरोबर रस्त्याचे रुंदीकरण करावे, संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी हेमंत पालकर आणि नीलेश सालेलकर यांनी केली आहे.

रस्‍ता व पूल बांधणार : प्रेमेंद्र शेट

सारमानस-टोंक जलमार्गावरील गोंधळ आणि अनर्थ टाळण्यासाठी पर्याय म्हणून सारमानस ते आमोणे असा पाच किलोमीटर अंतर लांबीचा रस्ता तसेच पूल बांधण्यात येणार आहे. तसा सरकारचा प्रस्ताव असून, या दोन्ही कामांची निविदा आणि अन्य सोपस्कार अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली. सारमानस-टोंक जलमार्गावर घडणाऱ्या दुर्घटनांबद्दल त्‍यांनी चिंता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT