Bicholim Accident  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: 3 दुचाकी एकमेकांवर आदळल्या, डिचोली-साखळी रस्त्यावर विचित्र अपघात; एकजण जखमी Video

Goa Accident: हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावरील वाठादेव येथे बगलमार्ग जंक्शनजवळ घडला. अपघातग्रस्त तिन्ही दुचाकी डिचोलीच्या दिशेने जात होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: तीन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एक शिक्षिका जखमी झाली. सुदैवाने या अपघातात तिन्ही स्कूटरचालक बचावले. हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावरील वाठादेव येथे बगलमार्ग जंक्शनजवळ घडला. अपघातग्रस्त तिन्ही दुचाकी डिचोलीच्या दिशेने जात होत्या.

यासंबंधीची माहिती अशी की, जीए-०७-व्हाय-६३२४ या क्रमांकाची स्कूटर डिचोलीच्या दिशेने जात असता, स्कूटर चालकाने अचानक स्कूटर डाव्या बाजूने घेतली असता, मागाहून येणाऱ्या जीए-०४-एम-९३२९ या क्रमांकाची स्कूटर समोरच्या स्कूटरला धडकली.

त्याचवेळी त्याच्यामागे असलेली जीए-०४-एन-१००५ या क्रमांकाची स्कूटर समोरच्या स्कूटरला धडकली. एकमेकांना धडक बसल्याने तिन्ही स्कूटरवरील चालक तोल जाऊन रस्त्यावर पडले. पेशाने शिक्षिका असलेली शेवटच्या स्कूटरची चालक या अपघातात जखमी झाली.

जखमी शिक्षिकेला उपचारार्थ त्वरित डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डिचोली पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT