Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Assonora car accident: पोलिसांच्या माहितीनुसार, शिरगावकर हा पांढऱ्या रंगाच्या कारमधून वेगाने रस्त्यावरून जात असताना दारूच्या नशेत वाहनावरचा त्याचा ताबा सुटला.
Assonora car accident
Assonora car accidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कैलासनगर - अस्नोडा येथे कार कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात दीपेश मांद्रेकर (वय ४१) याचा कालव्यात बुडाल्याने मृत्यू झाला. त्याचा मित्र रितेश शिरगावकर (वय ३५) हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने ही घटना घडल्याचा संशय असल्याने या प्रकरणात संशयित रितेश शिरगावकर (वय ३५) याने सत्र न्यायालयासमोर दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

९ नोव्हेंबर रोजी झालेल्या या अपघाताची नोंद कोलवाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिरगावकर हा पांढऱ्या रंगाच्या कारमधून वेगाने रस्त्यावरून जात असताना दारूच्या नशेत वाहनावरचा त्याचा ताबा सुटला.

Assonora car accident
Mandrem Accident: मांद्रे स्वयंअपघात, पुलीस कॉन्स्टेबलाक मरण; Video

त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्यात कोसळली. अर्जदाराच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, ही घटना मित्रांमधील दुर्दैवी अपघात असून हेतुपुरस्सर केलेला गुन्हा नाही. शिरगावकरच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी १०० मिली आढळली असून मोटार वाहन कायद्यातील ३० मि.ग्रॅ. मर्यादेपेक्षा ती कमी आहे.

Assonora car accident
Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम १०५ लागू होत नाही, असे त्यांनी नमूद केले. तसेच अर्जदार तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी न्यायालयास सांगितले. सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध करताना अर्जदार तपासात सहकार्य करत नसल्याचे निदर्शनास आणले. रात्री उशिरा निर्जन ठिकाणी दोघे कशासाठी गेले होते असा प्रश्न उपस्थित करून अपघातासंबंधी महत्त्वाची माहिती तो लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com