Bicholim river pollution Dainik Gomantak
गोवा

Bicholim River: पाणी आहे की गटारगंगा? गोव्यातील 'ही' नदी सर्वात जास्त प्रदूषित; प्रदूषण मंडळाच्या अहवालाने वाढली चिंता

Bicholim river pollution: डिचोलीची नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, दिवसेंदिवस या नदीत मानवनिर्मित प्रदूषणाचे आक्रमण वाढत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोलीची नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, दिवसेंदिवस या नदीत मानवनिर्मित प्रदूषणाचे आक्रमण वाढत आहे. त्यातच केंद्रीय आणि राज्य प्रदूषण मंडळानेदेखील आपल्या अहवालात डिचोलीची नदी सर्वात जास्त प्रदूषित असल्याचे नमूद केले आहे.

सध्या तर या नदीचे पाणी आटले असून, नदी अक्षरशः काळपट बनली आहे. या नदीच्या सद्यस्थितीबाबत पर्यावरणप्रेमींनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकार तसेच नगरपालिकेसह पंचायतींनी वेळीच उपाययोजना केली नाही, तर या नदीचे अस्तित्व संकटात येण्याचा धोका आहे, अशी भीती पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील तळेखोल येथून उगम झालेली डिचोलीची नदी ही मांडवीची उपनदी आहे. डिचोलीहून पुढे सारमानस येथे ही नदी मांडवी नदीला जाऊन मिळते. या नदीवर कुडचिरे ते डिचोलीपर्यंत आठ ते नऊ बंधारे आहेत.

या नदीत काहीजण घरातील किंवा हॉटेलमधील सुका आणि ओला कचरा तसेच टाकाऊ पदार्थ टाकत असल्याची माहिती मिळाली आहे. विविध ठिकाणी या नदीत आजही नियमित कपडे धुण्याचे प्रकार घडत आहेत. राज्याबाहेरील लोक सर्रासपणे नदीच्या पाण्यात कपडे धुताना दिसून येतात.

नदीत सोडले जाते सांडपाणी!

डिचोली शहरात मलनिस्सारण प्रकल्प नसल्याने सांडपाण्याची मोठी समस्या आहे. पावसाळ्यात तर नदीजवळील भागातील सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर नदीत मिसळते. काही ठिकाणी पाईपद्वारे बाहेरील पाणी या नदीत सोडण्यात येत आहे. नदीला जोडलेल्या फाट्यातून नदीत अस्वच्छता पसरते. डिचोली हा भाग खाणपट्ट्यात येत असल्यामुळे पावसाळ्यात खनिजमिश्रित पाणी नदीत मिसळते. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जूनपर्यंत पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करा! CM सावंतांचे निर्देश; मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाच्या कामाचाही घेतला आढावा

राज्यात 'Three Kings Feast'ची धूम! कासावली, चांदोर, रेइस मागोसमध्ये भक्तीचा उत्साह

Pilgao: ‘श्री चामुंडेश्‍‍वरी माता की जय’! वरगाव-पिळगाव भक्तिमय, रंगला नौकाविहार; दिंडी-पालखी, फटाक्यांची आतषबाजी

VIDEO: एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या छिद्रात अडकला चोरटा; घरमालकानं पोलिस बोलवल्यानंतर रंगलं रेस्क्यु ऑपरेशन Watch

Goa Live News: "रवी नाईकांच्या मुलालाच उमेदवारी द्या"; फोंडा पोटनिवडणुकीवर सुदिन ढवळीकर आपल्या भूमिकेवर ठाम

SCROLL FOR NEXT