Sal River Boat Incident: ..मच्छीमार बोट रुतली गाळात! साळ नदीत अडकली माणसे; कुटबण जेटीजवळील दुर्घटना

Goa River Fishing Boat: मासेमारी करून ही बोट परत येत असताना ती गाळात रुतली, शेवटी दुसरी बोट आणून या बोटीतील मासे आणि माणसांना बाहेर काढण्‍यात आले.
Cutbona fishing boat | Sal river incident |  Goa fishing jetty
Cutbona fishing boat | Sal river incident | Goa fishing jetty Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : साळ नदीत रेतीचे पट्टे तयार होऊन गाळ वाढल्‍यामुळे मच्‍छीमारी बोटींना या नदीतून येण्‍यासाठी त्रास होतो, अशा आशयाच्‍या तक्रारी मागची कित्‍येक वर्षे चालू असतानाच काल मासेमारी करून परतताना आणखी एक मच्‍छीमारी बोट या गाळात रुतून पडली.

यामुळे इतर बोटींच्‍या हालचालीवर मर्यादा आल्‍या असून साळ नदीत वाढलेला हा रेतीचा गाळ काढून बोटीसाठी मार्ग मोकळा करावा, नदीतील गाळ काढावा, अशा या मागणीने पुन्‍हा एकदा जोर धरला आहे.

Cutbona fishing boat | Sal river incident |  Goa fishing jetty
Sal River: चिंतेची बाब! साळ नदीचे अस्तित्व धोक्यात, आसपासच्या शेतीला धोका; प्रदूषणमुक्तीसाठी 'आप'चे आवाहन

काल कुटबण जेटीजवळून काही अंतरावर ही दुर्घटना घडली. मासेमारी करून ही बोट परत येत असताना ती गाळात रुतली, शेवटी दुसरी बोट आणून या बोटीतील मासे आणि माणसांना बाहेर काढण्‍यात आले. यापूर्वी या नदीतील गाळ काढण्‍यासाठी निविदा जारी झाली होती. पण या कामाला हरित लवादासमोर आव्‍हान दिल्‍याने हे काम अडले होते.

Cutbona fishing boat | Sal river incident |  Goa fishing jetty
Chorao Ferryboat: निष्काळजीपणामुळे बुडाली होती 'बेती फेरीबोट'! चोडण दुर्घटनेबाबत बंदर कप्तान खात्याचा अहवाल सादर

त्‍यानंतर मच्‍छीमार खात्‍याने पर्यावरणीय अभ्‍यास करून हा प्रकल्‍प हाती घ्‍यावा, अशा सूचना हरित लवादाकडून करण्‍यात आल्‍या होत्‍या. मात्र मच्‍छीमार खात्‍याने हा अभ्‍यास अद्याप सुरू केलेला नाही. त्‍यामुळे हा प्रकल्‍प अजूनही मार्गी लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com