Bicholim Police Dainik Gomantak
गोवा

Shel Melavli: डिचोली पोलिसांची धडक कारवाई! शेळ-मेळावली येथील अवैध चिरेखाणीवर छापा; 20 लाखांची यंत्रसामग्री जप्त

Shel Melavli Mine Raid: पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत शेळ-मेळावली येथे एका बेकायदा चिरेखाणीवर छापा टाकून चिरे काढण्याखाणी वापरण्यात येणारी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री जप्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Shel Melavli Illegal Slaughterhouse Mine Busted in Bicholim Police Raid

वाळपई: पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत शेळ-मेळावली येथे एका बेकायदा चिरेखाणीवर छापा टाकून चिरे काढण्याखाणी वापरण्यात येणारी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री जप्त केली. जप्त केलेल्या यंत्रसामग्रीची किमत अंदाजे २० लाख रुपये असल्याची माहिती मिळाली. आज (रविवारी) ही कारवाई केली. डिचोलीचे पोलिस अधीक्षक जिवबा दळवी ही माहिती दिली.

शेळ-मेळावली येथील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे चिरे काढण्याचा व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच, वाळपई पोलिस स्थानकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सानिषा नाईक आणि पोलिस उपनिरीक्षक अल्लाउद्दीन खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने संबंधीत खाणीवर धाड मारली. चिरेखाणीवर धाड घातलेल्या पथकात पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश गावस, उल्हास गावस यांचा समावेश होता.

पोलिसांनी कारवाई करुन ५ पॉवर टिलर, चिरे कापण्याची ४ यंत्रे आणि २ जनरेटर जप्त केले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि खाण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी आणि पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT