Bicholim Bungalow Theft Dainik Gomantak
गोवा

Bicholim Theft: पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे! तपासाला गती

Bicholim Police: परिचयातील व्यक्तींचा हात असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोलीतील धाडशी बंगला फोडीप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून, पोलिसांनी त्यादिशेने तपासाला गतीने सुरवात केली आहे. रोलिंगमिलपासून जवळच मुस्लिमवाडा येथील मोहम्मद इक्बाल मामलेकर यांचा बंगला फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, यूएस डॉलर्स आणि सुवर्णालंकार मिळून जवळपास एक कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

ज्या रात्री मामलेकर यांचा बंगला फोडण्याची घटना घटना घडली, त्या रात्री बंगल्यात कोणीही नव्हते. बंगला बंद होता. तीच संधी साधून चोरट्यांनी बंगला फोडून धाडसी चोरी केली. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील्स तोडून आत प्रवेश मिळवला आणि आतील कपाटे फोडून चोरी केली.

चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आतून मुख्य दरवाजा तोडून पलायन केल्याची माहिती मिळाली. बंद बंगल्यात झालेली चोरी पाहता, यामागे परिचयातील व्यक्तींचा हात असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

‘सीसीटीव्ही फुटेज’ हाती

चोरी झाली त्या रात्री चोरटे बंगल्यापर्यंत आल्याचे दृश्‍य तेथीलच एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यात चोरट्यांनी हातात ग्लोव्हज घातल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी हे फुटेज मिळवले असून, त्यादिशेने तपास सुरू केला आहे. डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक एकोस्कर आणि पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरू आहे. एकाबाजूने मंदिरे फोडण्याच्या घटना वाढल्या असतानाच आता धाडसी बंगला फोडी झाल्याने पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

Goa Salt Pans: 1964 साली गोव्यात 200 हून अधिक मिठागरे होती आणि आज..?

Goa Live News: साष्टी तालुक्यात वाहतूक पोलिसांचा 'बडगा'

SCROLL FOR NEXT