Kelbai Devi Temple Gomantak Digital Team
गोवा

Bicholim News : केळबाई देवीचे मंदिर २४ तासांत खुले करा!

मयेतील नाईक गावकर गटाची मागणी : वादास देवस्थानसह प्रशासन जबाबदार

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले मये येथील श्री केळबाई देवीचे मंदिर २४ तासाच्या आत खुले करा, अशी जोरदार मागणी मये येथील नाईक गावकर गटातील पार्वती गावस, सरस्वती नाईक आदी महिलांनी केली आहे. आज रात्री मये येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मंदिर खुले करण्यास टाळाटाळ झाल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.

मयेतील वाद चिघळण्यास देवस्थान समिती आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही महिलांनी करुन याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून देवीचे मंदिर खुले करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही या महिलांनी केली आहे. गेल्या चार दिवसांपासून श्री केळबाई मंदिर बंद असून, जत्रेनिमित्त भाविकांनी भरलेल्या ओट्या अजूनही मंदिराच्या दरवाजावरच पडून आहेत. दरवाजावर ओट्यांचा खच पडला आहे.

देवस्थान, प्रशासन जबाबदार

गेल्या सोमवारी पहाटे मुळगाव येथील देवीच्या पेठेचे मये येथे आगमन झाले. तेव्हापासून श्री केळबाई देवीचे मंदिर बंद आहे. हा प्रकार निदर्शनास आणताच मंदिर खुले करावे, अशी नोटीस देवालयांचे प्रशासक असलेल्या डिचोलीच्या मामलेदारांनी माल्याच्या जत्रेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी (ता.२८) जारी केली. मात्र देवस्थान समितीने या नोटीशीचे पालन केले नाही, की नोटीस वगळता मंदिर खुले करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली नाहीत, असा ठाम दावा या महिला वर्गातर्फे करण्यात आला.

वाद चिघळण्यास कारण

जत्रेच्या दिवशी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांतून भाविक श्री केळबाई मंदिरात आले होते. मात्र मंदिर बंद राहिल्याने हे भाविक बरेच नाराज बनले. बहुतेक भाविकांनी या प्रकाराबद्दल संतापही व्यक्त केला. मंदिर खुले करण्यात येत नसल्याचे पाहून नाईक गावकर गटातील काहीजण गावकरवाडा येथे गेले. मामलेदारांचा आदेश असूनही मंदिर बंद का, असा प्रश्न उपस्थित केला असता, देवस्थान समितीशी संबंधित परब गटातील नाईक गावकर गटातील एका युवकास मारहाण करण्यास सुरवात केली. त्यातूनच हा वाद चिघळला आणि पुढील नाट्य घडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT