Bicholim Murder Case Dainik Gomantak
गोवा

Bicholim Murder Case: दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून केला होता खून; आसामच्या कामगाराला पणजी न्यायालयाने सुनावली जन्मठेप

डिचोलीत घडले होते प्रकरण; पहिल्या पत्नीचीही केली होती हत्या

Akshay Nirmale

Court Decision on Bicholim Murder Case : गोव्याच्या डिचोली तालुक्यात 2016 मध्ये झालेल्या पत्नीच्या खून प्रकरणात पती अमितकुमार दास (49)याला पणजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दास हा मूळचा आसामचा रहिवासी आहे.

हेलन सरकार ही त्याची दुसरी बायको होती. दरम्यान, दास याने पहिल्या पत्नीचाही खून केला होता.

अमितकुमार दास हा डिचोली-कुडचडे येथे पत्नी हेलन सरकार हिच्यासोबत राहत होता. त्याने तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यापुर्वीच त्याने हणजुणे किनाऱ्यावर त्याची पहिली पत्नी मनदीपा हिचीदेखील हत्या केली होती. पोलिसांना त्याने तशी कबुली दिली आहे.

2016 मध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हेलन लग्न करून 21 फेब्रुवारीला तो गोव्यात आला होता. तो येथे सेल्समन म्हणून काम करत होता. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी होती.

हेलन आणि अमित यांचे भांडण झाल्यावर त्याने चिडून तिची गळा दाबून हत्या केली होती. पोलिसांसमोर खुनाची कबुली देताना संशयातून त्याने हेलनचा खून केल्याचे म्हटले होते.

त्यानंतर त्याने हेलनचा मृतदेह खडकाच्या खाणीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. दगड पडून तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सुरवातीला पोलिसांनी सांगितले. दुर्गंधी येऊ लागल्याने या खूनाला वाच्यता फुटली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

SCROLL FOR NEXT