डिचोली: खनिज वाहतुकीवरून डिचोलीत निर्माण झालेला ‘गुंता’ सुटला नसतानाच, आता ट्रकमालक आणि शेतकऱ्यांत संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. डिचोली ट्रकमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानावरून पिळगावमधील शेतकरी आक्रमक बनले आहेत.
खनिज वाहतूक (Mineral Transport) पूर्ववत सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही रस्त्यावर उतरून प्रतिकार करू, असा पवित्रा ट्रकमालकांनी घेतल्याने पिळगावमधील शेतकऱ्यांत खळबळ माजली आहे.
दरम्यान, ट्रकमालकांना शक्तीप्रदर्शन दाखवून देण्यासाठी गुरुवारी सकाळी पिळगावमधील शेतकरी मुलांबाळांसह आंदोलनस्थळी एकत्रित होणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यावेळी शेतकरी आपली पुढील भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
शेती आणि कपात केलेल्या कामगारांचा (Workers) प्रश्न पुढे करून पिळगावमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून माठवाडा-सारमानस जंक्शनजवळ ‘वेदांता’च्या खाणीवरील खनिज वाहतुकीचा रस्ता अडवला आहे. २२ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, खनिज वाहतूक अजूनही बंद आहे. आंदोलनप्रश्नी प्रशासकीय पातळीवर बैठका झाल्या. मुख्यमंत्र्यांनीही गेल्या रविवारी शेतकरी, कामगार आणि ट्रकमालकांची स्वतंत्रपणे बैठक घेतली. मात्र खनिज वाहतुकीवरून उद्भवलेला गुंता सुटलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.