Bicholim Market  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market : डिचोली बाजार संकुलात ‘गळती’ची समस्या कायम; व्यापाऱ्यांमध्ये चिंता

Bicholim Market : यंदा तरी ‘गळती’पासून आम्हाला मुक्ती मिळेल काय? असा प्रश्न या विक्रेत्यांसह दुकानदारांना सध्या सतावत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Market :

डिचोली, बाजार संकुलाच्या छपराची दुरुस्ती केली असली, तरी या संकुलात ‘गळती’ची समस्या कायम आहे. अलीकडेच पडलेल्या अवकाळी पावसावेळी या संकुलातील काही भागात ‘गळती’ लागली होती.

त्यामुळे संकुलातील फळभाजी विक्रेत्यांसह दुकानदारांची चिंता वाढली आहे. यंदा तरी ‘गळती’पासून आम्हाला मुक्ती मिळेल काय? असा प्रश्न या विक्रेत्यांसह दुकानदारांना सध्या सतावत आहे.

गेल्या तीन पावसाळ्यांपासून डिचोलीतील तिसऱ्या टप्प्यातील बाजार संकुलात पावसाच्या ‘गळती’ची समस्या आहे. गेल्यावर्षी तर ही समस्या गंभीर बनली होती. नंतर पालिकेने छपराची डागडुजी केली.

त्यानंतर आता यंदाच्या पावसाळ्यात गळतीपासून मुक्ती मिळणार असे व्यापाऱ्यांना वाटत असतानाच, अवकाळी पावसाने गळतीची झलक दाखवून दिली आहे. आता पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे फळभाजी विक्रेत्यांसह अन्य व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

संकुलात जलधारा

गेल्या तीन पावसाळ्यांपासून डिचोलीतील बाजार संकुल इमारतीला गळतीचे ग्रहण लागले आहे. गेल्यावर्षी ही समस्या मोठी आणि गंभीर झाली होती. पावसावेळी संकुलाच्या छपरातून पाण्याची गळती लागते. जोरदार पाऊस पडला, की संकुलात सर्वत्र जलधारा सुरू होतात आणि मग फळ - भाजी आदी विक्रेत्यांसह दुकानदारांची धांदल उडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sneha Gitte: डॉ. स्नेहा गीते अद्याप गोव्यातच! लईराई जत्रा चेंगराचेंगरी प्रकरणानंतर झाली होती बदली; प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्‍न

Goa Live News: संततधार पावसामुळे सोनाळचा रस्ता पाण्याखाली

Surla Project: 'सुर्ला प्रकल्प रद्द करा, पर्यावरण वाचवा'! ग्रामस्‍थ व पर्यावरणप्रेमींची PM मोदी, CM सावंतांकडे आग्रही मागणी

Vishwajit Rane: गोव्यात एका वर्षात 5 लाख झाडे लावणार, मंत्री राणेंची ग्वाही

Goa Eco Sensitive Zone: गोवा सरकारला मोठा धक्का! जैवसंवेदनशील 22 गावे वगळण्याच्या प्रयत्नांना खो; केंद्राला हवी आणखी माहिती

SCROLL FOR NEXT