Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: डिचोलीत नेमके किती 'बिबटे' फिरताहेत? 2 पकडून नेले, तिसऱ्याच्या वावराच्या खाणाखुणा; स्थानिक भयभीत

Bicholim Leopard: दरम्यान, बिबट्याच्या दहशतीसंबंधी वन खात्याला कल्पना देण्यात आली असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: यापूर्वी दोन बिबटे पकडकेल्या डिचोली शहराजवळील धबधबा परिसरात पुन्हा एकदा गेल्या तीन-चार दिवसांपासून भर लोकवस्तीजवळ एका बिबट्याची दहशत सुरू असून, बिबट्याकडून कुत्र्यांना फस्त करण्याचे सत्र सुरू आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे लोक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, बिबट्याच्या दहशतीसंबंधी वन खात्याला कल्पना देण्यात आली असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. धबधबा भागात रात्रीच्यावेळी लोकवस्तीजवळ फिरताना काहीजणांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी प्रभू नामक व्यक्तीच्या घराजवळ या बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला फस्त करण्याची घटना घडली आहे. हल्ला करतानाचे हे दृश्‍य सीसीटिव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहे, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

बिबट्यांच्या अधिवासाच्या खाणाखुणा

यापूर्वी गेल्या जानेवारी महिन्यात आणि त्याच्यापूर्वी मिळून वर्षभरात धबधबा परिसरात दोन बिबटे पकडण्यात वन खात्याला यश आले होते. दोन बिबटे पकडूनही गेल्या जानेवारी महिन्यात काही दिवस धबधबा परिसरात आणखी एका बिबट्याचा संचार होता. आता पुन्हा एकदा या भागात बिबट्या असल्याच्या खाणाखुणा आढळून आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी शहरातील कृष्णानगर परिसरात बिबट्याचा संचार होता. महिन्यापूर्वी शहरातील व्हाळशी येथील संकल्प गार्डन वसाहतीत तेथील रहिवाशांना बिबट्याचे दर्शन झाले होते. सहा महिन्यांपूर्वी साष्टीवाडा-बोर्डे येथे कारची धडक बसून एक बिबट्या जखमी झाला होता. गेल्यावर्षी लामगाव परिसरात बिबट्याने दहशत घातली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT