Bicholim Lamgao building demolition Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीतील निवासी इमारत मोजतेय अखेरच्या घटका! अनैतिक धंद्यांसाठी वापर; वीज खात्याकडून बांधकामाचा प्रस्ताव रेंगाळला

Bicholim Lamgao: लामगाव येथील वीज खात्याची निवासी इमारत दिवसेंदिवस ढासळत असून, ती अखेरच्या घटका मोजत आहे. ही इमारत मोडून त्याजागी नवीन इमारत बांधण्याचा वीज खात्याचा प्रस्ताव आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोली शहरातील लामगाव येथील वीज खात्याची निवासी इमारत दिवसेंदिवस ढासळत असून, ती अखेरच्या घटका मोजत आहे. ही इमारत मोडून त्याजागी नवीन इमारत बांधण्याचा वीज खात्याचा प्रस्ताव आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात वीजमंत्री सुदिन ढवळीकर भूमिगत वीजवाहिनी कामाच्या पायाभरणीनिमित्त डिचोलीत आले होते. त्यावेळी त्यांनी कमकुवत आणि विनावापर असलेली इमारत जमीनदोस्त करून त्याजागी सुमारे १० कोटी रुपये खर्चून वीज खात्याच्या कार्यालयासाठी सुसज्ज नवीन इमारत बांधण्यात येणार आहे, अशी घोषणा केली होती. मात्र, अजूनतरी हा प्रस्ताव मार्गी लागलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ निधी मंजूर झाला नसल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव रेंगाळत पडला असल्याचे समजते. एकदा काय वित्त खात्याकडून नवीन इमारतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली की, नियोजित इमारतीची पायाभरणी करण्यात येणार आहे.

रात्रीच्यावेळी या इमारतीत अनैतिक धंदे चालतात, अशी माहितीही लामगाव येथील काही नागरिकांनी दिली. या इमारतीत निर्माण झालेली अस्वच्छता पाहता, रोगराई पसरण्याची भीतीही वर्तविण्यात येत आहे. या इमारतीची देखभाल करण्याकडे आतापर्यंत वीज खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

इमारत ढासळतेय..!

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ बंद असलेली लामगाव येथील वीज खात्याची निवासी इमारत पूर्णत: मोडकळीस आली आहे. या इमारतीत पूर्वी वीज खात्याचे कर्मचारी राहत होते. मात्र, देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज उपकेंद्र कार्यालय परिसरात असलेल्या या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. ही इमारत जवळपास कोसळल्यातच जमा आहे. इमारतीला वेली-झुडपांनी वेढले असून, आत सापांचाही वावर असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT