Bicholim: ..अचानक बँकेचा 'सायरन' वाजू लागला! पोलीस, अग्निशमनची उडाली धावपळ; कारण बघून जीव पडला भांड्यात

Bicholim Bank Siren: भर बाजारात टाकाऊ टायर पेटल्यानंतर बँकेचा ‘सायरन’ वाजू लागल्याने अग्निशमन दल आणि पोलिस यंत्रणेला धावपळ करावी लागली. आग वेळीच नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
Bicholim bank siren alarm
Bicholim bank siren alarmDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : भर बाजारात टाकाऊ टायर पेटल्यानंतर बँकेचा ‘सायरन’ वाजू लागल्याने अग्निशमन दल आणि पोलिस यंत्रणेला धावपळ करावी लागली. आग वेळीच नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला खरा, मात्र ‘सायरन’ वाजतच राहिला. अखेर जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी ‘सायरन’ यंत्रणा बंद करण्यात यश मिळवल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. ही घटना सोमवारी (ता.१५) पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास डिचोलीच्या बाजारात घडली.

यासंबंधीची माहिती अशी की, बाजारातील एका रोडवेज कंपनीच्या आस्थापनासमोर पडून असलेल्या टाकाऊ टायरला अचानक आग लागली. टायरने पेट घेताच निर्माण झालेला धूर बाजूला असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बसविलेल्या ‘सायरन’च्या ‘स्मोक नियंत्रण’ यंत्रणेत धूर गेल्याने सायरन वाजू लागला.

आगीची आणि सायरन वाजत असल्याची माहिती मिळताच, डिचोली अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकारामुळे धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर महेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी टायर लागलेली आग नियंत्रणात आणली. मात्र, बँकेचा सायरन वाजतच होता. तो नंतर बंद करण्यात आला.

Bicholim bank siren alarm
Goa SAG: ‘साग’मधील जंगी स्‍वागतामुळे संचालक गावडे वादात, कारणे दाखवा नोटिस; गावडे - तवडकर वादाची चर्चा

दरम्यान, टायरला आग नेमकी कशी लागली ते समजू शकले नाही. मात्र ‘सायरन’ वाजला नसता, तर आगीची कल्पना आली नसती आणि एखादेवेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

Bicholim bank siren alarm
Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

पोलिसांसमोर अडचण

बँक बंद असल्याने व बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ‘सायरन’ बंद करण्यात यश मिळवले. त्यामुळे जवळपास तासभर चाललेली धावपळ थांबली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com