Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Bicholim Theft: डिचोलीत चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 2 आस्थापने फोडली; पोलिसांसमोर आव्हान

Karapur Tisc Theft: पिळगाव येथील ‘वेदांता’ खाण कंपनीच्या मालमत्तेतून लोखंडी प्लेट चोरल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी दोन संशयित युवकांना अटक केली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: गेल्या वर्षी धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा डिचोली परिसरात चोरटे सक्रिय झाले आहेत. गुरुवारी (ता. १२) रोजी रात्री अज्ञात चोरट्याने कारापूर-तिस्क परिसरात एक सहकारी पतसंस्था मिळून एकाच रात्री दोन आस्थापने फोडली.

या चोरीत चोरट्याच्या हाती मोठे घबाड लागले नसले, तरी जवळपास पाच हजाराहून अधिक रुपये चोरट्याच्या हाती लागल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्रीच पिळगाव येथील ‘वेदांता’ खाण कंपनीच्या आवारातून लोखंडी प्लेट चोरल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी दोन संशयित युवकांना अटक केली आहे.

या चोरीप्रकरणी डिचोली पोलिसांनी पंचनामा करून श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करून चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असला, तरी अद्याप पोलिसांच्या हाती चोरटा सापडलेला नाही. या चोरीप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, पिळगाव येथील ‘वेदांता’ खाण कंपनीच्या लोखंडी प्लेट चोरल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. मूळ महाराष्ट्र येथील आणि साखळी परिसरात राहणाऱ्या अनिल सुभाष जाधव आणि सचिन दिलीप माने यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिस उपनिरीक्षक रश्मीर परब मातोंडकर यांच्या नेतृत्वाखालील हवालदार नीलेश फोगेरी आणि पोलिस कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर या पोलिस पथकाने ही कारवाई केली. या चोरीप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

प्लेट चोरीप्रकरणी अटक

पिळगाव येथील ‘वेदांता’ खाण कंपनीच्या मालमत्तेतून लोखंडी प्लेट चोरल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी दोन संशयित युवकांना अटक केली आहे. गुरुवारी रात्रीच चोरीचा हा प्रकार घडला होता. संशयित युवकांनी चोरलेल्या सामानासह त्यांच्याकडील स्कुटरही पोलिसांनी जप्त केली आहे. दोन्ही संशयित पोलिस कोठडीत आहेत. वेदांताच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास करुन संशयित युवकांच्या मुसक्या आवळल्या.

एकूण ५,१५० रुपयांची चोरी

गुरुवारी रात्री कारापूर-तिस्क परिसरात असलेल्या माशेल सहकारी पतसंस्थेत अज्ञात चोरट्याने खिडकीचे गज कापून आत प्रवेश मिळवला. मात्र, चोरट्याच्या हाती केवळ दीडशे रुपये लागले. त्यानंतर चोरट्याने पतसंस्थेला टेकून असलेल्या ‘लाईफलाईन’ फॉउंडेशन या आस्थापनात घुसून रोख पाच हजार रुपयांची चोरी केली. माशेल अर्बनच्या शिडीवर चढून चोरट्याने ही दोन्ही आस्थापने फोडून चोरी केल्याचे कळते. तसे दृष्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची जागतिक पातळीवर छाप; ठरले आशिया पॅसिफिकमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व

Goa Kidnapping Case: बेपत्ता शाळकरी मुलांची महाराष्ट्रातून सुटका, उत्तर प्रदेशातील एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई

Goa Land Conversions: गोमंतकीयांशी चाललेली प्रतारणा थांबवा, थोडी तरी जमीन गोवेकरांसाठी ठेवा..

IND vs ENG 3rd Test: गिलसाठी 'लॉर्ड्स टेस्ट' बनणार अग्निपरीक्षा, क्रिकेटच्या पंढरीत कसा आहे भारताचा रेकॉर्ड? आकडे भरवतात धडकी

Murder Case Goa: गुप्तांग कापले, डोके ठेचले! पर्रा येथे कामगाराचा कोल्ड बल्डेड खून; बाप लेकाला अटक

SCROLL FOR NEXT