Bicholim: '40 वर्षांपासून संघर्ष सुरू, आता लढाईची वेळ'! मराठीप्रेमींचा एल्गार; राजभाषेचे स्थान मिळेपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार

Subhash Velingkar: मराठीसाठी मराठीप्रेमींनी संघटित व्हावे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी केले.
Subhash Velingkar | Marathi Language Dispute Goa
Subhash Velingkar | Marathi Language Dispute GoaDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मराठीसाठी मागील जवळपास चाळीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, आजपर्यंत मराठीप्रेमींच्या पदरात निराशाच पडली आहे. आता सहनशीलता संपली असून निर्णायक आणि ‘आरपार’च्या लढाईची वेळ आली आहे. मराठीचा गळा घोटणाऱ्या गद्दार राजकारण्यांना मराठीप्रेमींकडून त्यांची जागा दाखवून द्यायची आता वेळ आली आहे.

मराठीसाठी मराठीप्रेमींनी संघटित व्हावे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी केले. मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे आज (शनिवारी) डिचोलीत आयोजित मराठीप्रेमी कार्यकर्त्यांच्या प्रखंड मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

नाईकनगर-बोर्डे येथील वृंदा दीनानाथ तारी सभागृहात आयोजित या मेळाव्यास मराठी राजभाषा निर्धार समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, शाणुदास सावंत, युवा शक्ती केंद्राचे प्रमुख सुबोध मोने, मुकुंद कवठणकर, डिचोली प्रखंड प्रमुख बाबुसो सावंत, कीर्तनकार सायली गर्दे उपस्थित होत्या. मराठी राजभाषा झालीच पाहिजे, अशी प्रतिज्ञा यावेळी मराठीप्रेमींनी केली.

यावेळी अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडताना मराठीला राजभाषेचे स्थान मिळेपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार केला. उदय जांभेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आरती सादर केली. शेवटी पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली. ओंकार केळकर यांनी सूत्रसंचालन केले.

Subhash Velingkar | Marathi Language Dispute Goa
Mandrem: गोव्याचे भवितव्य घडवायचे असेल तर 'मराठी' राष्ट्रीय संस्कृती झाली पाहिजे; मांद्रेतील मेळाव्यात वेलिंगकरांचे प्रतिपादन

संघटित व्हा, ढवळीकर

मराठी हा गोमंतकीयांचा श्वास आणि ध्यास आहे. मराठीमुळेच अनेक वर्षांपासून गोव्यातील संस्कृती टिकून आहे. मराठीमुळेच अनेक कलाकार घडले आणि याच कलाकारांनी मराठीची पताका जगभर फडकवली आहे. गोव्यातील मराठीचा हा वैभवशाली इतिहास नजरेसमोर असताना राजकारण्यांनी मराठीशी प्रतारणा केली, असे मत गो. रा. ढवळीकर यांनी व्यक्त केले. मराठीप्रेमींनी कोकणीचा कधीच द्वेष केला नाही, की कोकणीला विरोध केला नाही. मात्र, कोकणीसह मराठीलाही तिचे हक्काचे स्थान मिळायलाच हवे आणि ते मिळविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यासाठी प्रसंगी टोकाचा निर्णय घेण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Subhash Velingkar | Marathi Language Dispute Goa
Marathi Language: 'मराठी न टिकवल्यास भवितव्य राहणार नाही'! वेलिंगकरांचे प्रतिपादन; लढ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

‘मराठीप्रेमींची ‘व्होट बॅंक’ व्हावी’

मराठीची अस्मिता टिकवून ठेवतानाच मराठी ही राजभाषा व्हायलाच पाहिजे. मराठीप्रेमींची ‘व्होट बॅंक’ आवश्यक आहे. मराठी राजभाषेचा हा विषय गोव्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोचविण्याची गरज असून त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे, असेही प्राचार्य वेलिंगकर पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com