Bicholim wall demolition issue Dainik Gomantak
गोवा

"तोडलेली भिंत बांधून द्या, नाहीतर...", जामा मशिदीच्या कुंपणावरून थेट कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा इशारा

Bicholim Jama Masjid dispute: मशिदीच्या व्यवस्थापन समितीतच अंतर्गत वाद उफाळून आला असून, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अध्यक्ष नझीर बेग यांच्यावरच बेजबाबदारपणाचे आरोप केले

Akshata Chhatre

डिचोली: आझाद जामा मशिदीच्या कुंपण भिंतीवरून सुरू असलेल्या वादाने आता अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणावरून मशिदीच्या व्यवस्थापन समितीतच अंतर्गत वाद उफाळून आला असून, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अध्यक्ष नझीर बेग यांच्यावरच बेजबाबदारपणाचे आरोप केले आहेत. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी (१ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे सचिव बाला आदम गोरी खान यांनी हे आरोप केले. ते म्हणाले की, "अध्यक्षांच्या दुटप्पी भूमिकेमुळे हा वाद चिघळला आहे. त्यांनी लवकरात लवकर तोडलेली भिंत पुन्हा बांधून दिली नाही, तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल."

वाद नेमका कशामुळे सुरू झाला?

गेल्या वर्षी डिचोली बसस्थानक ते मुस्लिमवाडा रस्त्याच्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून मशिदीची जुनी कुंपण भिंत तोडून ती मागे घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. यासाठी स्थानिक आमदार डॉ. प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत बैठक होऊन ना-हरकत प्रमाणपत्रही (NOC) मिळवण्यात आले होते. नवीन भिंतीसोबतच मशिदीच्या मागच्या बाजूने येण्या-जाण्यासाठी एक वेगळा मार्गही तयार करण्यात आला होता.

गेटमुळे वाद चिघळला

मात्र, बांधकाम सुरू असतानाच काही लोकांनी ही भिंत बेकायदेशीररित्या तोडली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. या वादाचे मुख्य कारण भिंतीला असलेली नवी मोठी गेट आहे. पूर्वी या भिंतीला तीन छोट्या गेटी होत्या, पण नव्या बांधकामात मध्यभागी साडेचार मीटर रुंदीची एकच मोठी गेट ठेवण्यात आली. या मोठ्या गेटला ज्या अध्यक्षांनी स्वतः मान्यता दिली होती, तेच आता या गेटच्या विरोधात बोलत आहेत.

अध्यक्षांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे हा तणाव वाढल्याचे आरोप व्यवस्थापकीय मंडळाने केले आहेत. अध्यक्षांच्या या दुटप्पी भूमिकेवर व्यवस्थापकीय मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नझीर बेग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून, या वादामुळे मशिदीच्या अंतर्गत कलहाला सार्वजनिक स्वरूप आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

पार्टीत ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न... प्रियाच्या जाण्याने प्रेमकथा अपूर्ण; 'ती' पोस्ट होतेय Viral

Bashudev Bhandari case: बाशुदेव भंडारी प्रकरण; एक वर्षानंतरही ‘तो’ कुठे आहे? गूढ कायम

Ganesh Visarjan Mapusa: 'तो' देवदूतासाखा धावून आला! गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या कर्नाटकच्या गणेशभक्ताला लाईफसेव्हरनं वाचवलं; म्हापसातील घटना VIDEO

Cyber Attack: 'सायबर' हल्ल्याचा धोका वाढला! गुगलची 250 कोटी जीमेल यूजर्संना तातडीची चेतावणी जारी; पासवर्ड बदलण्याची केली सूचना

SCROLL FOR NEXT