
South Goa Sessions Court Verdict: दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 43.20 कोटी किमतीच्या कोकेन प्रकरणात आरोपी मंगेश वाडेकर याला सशर्त जामीन मंजूर केला. चिखली येथील या सनसनाटी अंमली पदार्थ प्रकरणात झालेल्या अटकेनंतर आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती पूजा कवळेकर यांनी हा जामीन मंजूर केला. अंमली पदार्थांची मोठी किंमत आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला कठोर अटी शर्ती घालून जामीन दिला. या अटींचे पालन करणे आरोपीसाठी बंधनकारक असणार आहे.
न्यायालयाने आरोपी मंगेश वाडेकर याला जामीन देताना काही प्रमुख अटी घातल्या. आरोपीला 75,000 हजारांच्या जात मुचलक्यासह जामीन न्यायालयाने मंजूर केला. आरोपीला (Accused) पुढील दहा दिवस गुन्हे अन्वेषण विभाग (CID) समोर दररोज हजर राहून तपास यंत्रणेला सहकार्य करावे लागेल. तसेच, आरोपीला न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडून परदेशी जाता येणार नाही. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव न आणणे किंवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे अशा इतर कायदेशीर अटी आणि शर्तींचे पालन करणेही आरोपीसाठी बंधनकारक असेल.
चिखली परिसरात सुमारे 43.20 कोटी किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले होते. अंमली पदार्थांच्या तस्करीचे हे प्रकरण गोव्यातील (Goa) सर्वात मोठ्या प्रकरणांपैकी एक आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तपास यंत्रणेने जामिनाला विरोध केला होता, मात्र न्यायालयाने कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन सशर्त जामीन मंजूर केला.
आरोपीला जामीन मिळाला असला तरी, या प्रकरणातील पुढील न्यायिक प्रक्रिया आणि सुनावणी सुरु राहणार आहे. न्यायालयाने घातलेल्या कठोर अटींमुळे आरोपीला तपासातून पळ काढणे किंवा साक्षी-पुराव्यांवर प्रभाव टाकणे शक्य होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) या प्रकरणाचा सखोल तपास सुरु ठेवणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.