Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Goa Crime News: एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी महाराष्ट्रातील कणकवली येथील एका १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी महाराष्ट्रातील कणकवली येथील एका १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं करत अवघ्या २४ तासांत पीडित मुलीची सुखरूप सुटका केली आहे.

२४ सप्टेंबर रोजी रात्री पीडित मुलगी घरी परतली नाही. तात्काळ डिचोली पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. या गंभीर प्रकरणावर तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळ न घालवता दोन पथके तयार केली आणि त्यांना महाराष्ट्र व कर्नाटकमधील विशिष्ट ठिकाणी रवाना केले.

Goa Crime
Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

पोलीस निरीक्षक श्रीधर कामत आणि विराज धावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकाऱ्यांनी तांत्रिक साधने व गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली. या कार्यवाहीत पोलिसांनी ठळक आणि जलद कारवाई करत मुलीचा ठावठिकाणा शोधला.

Goa Crime
Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

अखेर पीडित मुलीला महाराष्ट्रातील कणकवली येथे सुरक्षित अवस्थेत सापडले. त्याच ठिकाणाहून पोलिसांनी आरोपी युवकास ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध अपहरणासह लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com