Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: हाउसिंग बोर्ड, डिचोलीत आंब्याचे झाड कोसळण्याच्या मार्गावर! नागरिकांना धोका, पालिकेकडे झाड हटवण्याची मागणी

Bicholim News: शहरातील हाउसिंग बोर्ड बालोद्यानाजवळील कमकुवत झालेले आंब्याचे झाड कोसळण्याच्या मार्गावर असून, परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: शहरातील हाउसिंग बोर्ड बालोद्यानाजवळील कमकुवत झालेले आंब्याचे झाड कोसळण्याच्या मार्गावर असून, परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्यावेळी हे झाड कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीतीही स्थानिक व्यक्त करीत आहेत.

वर्षभरापूर्वी या झाडाची एक मोठी फांदी कोसळली होती. मात्र, सुदैवाने त्यावेळी कोणताही अनर्थ घडला नव्हता. नेहमीच गजबजलेल्या या रस्त्यावर एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच हे धोकादायक झाड कापावे, अशी मागणी वाहनचालक आणि पादचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बालोद्यानाला लागूनच जंक्शनवरील आंब्याचे झाड पूर्णपणे सुकले आहे. दिवसेंदिवस हे झाड अत्यंत कमकुवत होत असून, हे झाड कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी भीती आहे. हे झाड आहे, तेथून लोक ये-जा करतात.

सायंकाळी या भागात मुलांचीही वर्दळ असते. त्याठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनेही पार्क करून ठेवतात. एखादा अनर्थ घडण्यापूर्वीच पालिकेने पुढाकार घेऊन हे झाड कापावे, अशी मागणी श्रीधर मयेकर आदी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1588 चे बंड, गोव्यात आणलेले जॉर्जियाच्या राणीचे अवशेष; इराण आणि गोवा

Bhausaheb Bandodkar: मुंडकरांना भाटकरांच्या जोखडातून मुक्त करणारे, बहुजनांचा मुक्तिदाता 'भाऊसाहेब बांदोडकर'

गोव्यातील मराठीचा इतिहास हा केवळ भाषेचा इतिहास नाही, तर तो सांस्कृतिक संघर्षाचा ज्वलंत दस्तऐवज! हाती राजदंड, पण पाय डळमळीत

Weekly Horoscope: चंद्र पडणार मोठा प्रभाव! 'या' राशींसाठी शुभसंकेत; वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Selaulim: सगळी शेतजमीन ओलिताखाली आली असती तर गोवा ‘ फूड सरप्लस ‘ झाला असता, पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही..

SCROLL FOR NEXT