Bicholim Waterfall  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Waterfall: हरवळेच्या धबधब्यावर पाण्याचा खळखळाट !

खाणबंदीमुळे गेल्या काही वर्षांपासून या धबधब्याच्या प्रवाहावर परिणाम जाणवलेला नाही. हा धबधबा बारामाही वाहत आहे.

दैनिक गोमन्तक

Bicholim Waterfall: पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेला हरवळे धबधबा यंदा अजूनही प्रवाहित असून, सध्या तेथे पाण्याच्या प्रवाहाचा खळखळाट जाणवत आहे. या धबधब्यावरील प्रवाहाचा सध्याचा जोर पाहता, पावसाळा सुरू होईपर्यंत तरी धबधब्याच्या प्रवाहावर परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.

दुसऱ्या बाजूने चालू जानेवारी महिन्यात हरवळेच्या धबधब्यावर पाण्याचा खळखळाट असला, तरी चालू मोसमात यंदा अधूनमधून अपवाद सोडल्यास पर्यटकांचा धबधब्यावर अभाव जाणवत आहे.

पावसाळ्यात हरवळेचा हा धबधबा ओसंडून वाहत असतो. पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी साधारण मार्च-एप्रिल महिन्यात या धबधब्याचा प्रवाह कमी होत असतो. दरम्यान, पावसाळ्यात गावोगावी घसघसणारे धबधबे कधीच बंद झाले आहेत.

यंदा उशिरापर्यंत पडलेल्या पावसामुळे धबधब्याच्या प्रवाह समाधानकारक असल्याचा अंदाज असला, तरी खाणबंदीमुळे गेल्या काही वर्षांपासून या धबधब्याच्या प्रवाहावर परिणाम जाणवलेला नाही. हा धबधबा बारामाही वाहत आहे.

सुट्टीच्‍या दिवशी गर्दी

हरवळे धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या धबधब्यावर स्थानिक पर्यटकांची येजा चालूच असली, तरी सुट्टीचे दिवस वगळता अन्य दिवशी पर्यटकांचा आकडा कमी असतो.

अधूनमधून विदेशी पर्यटकही या धबधब्यावर येतात. पाण्यात आंघोळ करणे धोक्याचे असल्याने तेथे सुरक्षारक्षक तैनात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: 13 वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले 1.1 कोटी

Quepem Crime: राहत्या घरात आढळला महिलेचा मृतदेह, केपे पोलिसांची त्वरित कारवाई; मध्य प्रदेशात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

Goa Bank Fraud: गोव्यात हातचलाखी करून खातेदारांना लाखोंची टोपी! महिला बँक कर्मचाऱ्यास अटक; पोलिस निरीक्षकाची तपासात हलगर्जी

SCROLL FOR NEXT