Bicholim Green Revolution
Bicholim Green Revolution Dainik Gomantak
गोवा

Bicholim Green Revolution: अठरा वर्षांच्या खंडानंतर हरितक्रांती

तुकाराम सावंत

Bicholim Green Revolution: तब्बल १८ वर्षांच्या खंडानंतर डिचोली तालुक्यातील सुर्ल गावात शेतकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीला अखेर फळ आले आहे.

सध्या सुर्ल गावात वायंगण शेती पूर्ण बहरात आली असून, गावात हरितक्रांती झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पडिक शेतजमीन पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प करताना तब्बल ४२ शेतकऱ्यांनी मिळून सुमारे ८५ हजार चौरस मीटर शेतजमीन यंदा वायंगण शेती लागवडीखाली आणली आहे.

कृषी खात्याच्या ''आत्मा'' उपक्रमाच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी ही लागवड केली आहे. यासाठी कृषी खात्याने अनुदान तत्त्वावर ''जया'' जातीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.

सध्या वायंगण शेती समाधानकारक बहरली असून, पुढील महिन्यापर्यंत कापणीसाठी भातपीक तयार होईल, असा अंदाज आहे.

विभागीय कृषी अधिकारी नीलिमा गावस, साहाय्यक कृषी अधिकारी पंकज पोकळे, ''आत्मा''च्या गट तंत्रज्ञान व्यवस्थापक पूनम महाले आणि शीतल डेगवेकर या अधिकाऱ्यांनी सुर्ल येथील वायंगण शेतीची पाहणी केली.

सुर्ल हा साखळी मतदारसंघातील खाणव्याप्त गाव. खाण व्यवसायामुळे येथील नैसर्गिक जलस्रोत संकटात आली.

त्यामुळे शेती-बागायतींना धोका निर्माण झाला. खाण व्यवसायामुळे गावातील शेतजमिनी ओस पडल्या होत्या.

शेतकऱ्यांचा संकल्प फळाला

जवळपास १८ वर्षे शेतजमीन पडिक होत्या. खाणबंदीनंतर गावातील आर्थिक स्रोतावर परिणाम झाला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पुन्हा शेती करण्याचा संकल्प केला. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी प्रयोग करून काही ठिकाणी हळसांदे पेरले.

परंतु हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. तरीही शेतकऱ्यांनी माघार घेतली नाही. शेती करायचीच, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आणि सरकारच्या ''अटल ग्राम योजनें''तर्गत शेतकऱ्यांनी वायंगण शेती लागवडीखाली आणली.

फार्मर्स सोसायटीची स्थापना

शेती व्यवसायाला गती देण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर्स सोसायटीची स्थापना केली. नंतर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सुर्ल गावातील पडिक शेती पुनरुज्जीवित करण्यासंबंधीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शेती करण्याच्या हालचालींना गती मिळाली. सरकारने गावात नेमलेल्या स्वयंपूर्ण मित्रांचीही मदत घेण्यात आली.

कृषी खात्याच्या सहकार्यामुळेच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ऊर्जा मिळाली. गावात हरितक्रांती घडविण्याचा मानस पूर्णत्वास आला. सध्या वायंगण शेती बहरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला पीक कापणीसाठी तयार होईल.

- विष्णू नाटेकर, शेतकरी, सुर्ल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Goa Rain Update: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

Kerala West Nile Virus: केरळला वेस्ट नाईल व्हायरसचा धोका; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार!

SCROLL FOR NEXT