Goa Farmer : आधारभूत किमतीची त्‍वरित अंमलबजावणी आवश्‍‍यक

शेतकऱ्यांची मागणी : काजू दरातील घसरण बनला चिंतेचा मुद्दा
Farmer
Farmer Gomantak Digital Team
Published on
Updated on

Goa Farmer: राज्यातील काजू व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून धोक्याची सूचना देत आहे. काजू दरात होणारी घसरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. काजूचा आकार लहान झाल्याने सध्या अनेक दुकानदार तसेच संस्थांनी खाजू खरेदी करणे बंद केले आहे.

काही दुकानदार विक्रेते घेऊन गेलेल्या पिशवीतील काजू वेचत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सोसावा लागतो. सरकारने काजूची आधारभूत किंमत150 रुपये निश्‍चित केली आहे. या दराची अंमलबजावणी तातडीने व्हावी, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

Farmer
Panaji Traffic Jam: पणजी, पर्वरी, रायबंदर, दिवजा सर्कल येथे प्रचंड वाहतूक कोंडी

फोंडा व धारबांदोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू बागायती असून अनेक कुटुंबे काजू व्यवसायावर अवलंबून आहेत.राज्यातील पिकांपैकी महत्त्वाचे मानले जाणाऱ्या काजूचा आकार लहान झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी एक किलो मागे 160पर्यंत काजू गर मिळत होते.

Farmer
Sudeep Will Join BJP : कन्नडचा हा सुपरस्टार भाजपमध्ये प्रवेश करणार? आधी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम...

परंतु सध्या काजूचा आकार लहान झाल्याने 250 हून अधिक काजू संस्थांना खरेदी करावे लागतात. गोव्यात सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कलमी काजूची लागवड केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. काजू दरात झालेली घसरण शेतकऱ्यासाठी चिंतेची बाब बनली आहे.

द. आफ्रिकेच्या काजूची गोवा काजू म्हणून विक्री

कारखानदार आफ्रिका तसेच इतर देशांतून काजू आयात करून गोव्यात प्रक्रिया करतात. गोव्यात मोठ्या संख्येने दक्षिण आफ्रिकेमधून काजू आयात केले जातात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काजू व्यावसायिक एकत्रित येऊन मोठ्या कंटेनरमधून काजू आयात करतात.

Farmer
Healthy Morning Recipe: हेल्दी स्प्राउट्स खाऊन कंटाळा आला तर बनवा स्वादिष्ट थेपला

आफ्रिकेमध्ये 70 ते 80 रुपये किलो दराने मिळणारा काजू गोवा राज्यातील कारखान्यात आणून सर्व प्रक्रिया केल्यानंतर राज्यातील काजू म्हणून गोव्याच्या बाजारात विकतात. काजू आयात करण्यासाठी सुमारे 1ते 2 टक्के कर लागू होतो. आयात करात काही टक्क्यांनी वाढ केल्यास निश्चित गोव्यातील काजू दर नियंत्रणात येणार असेही शेतकरी म्हणतात..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com