Goa Farmers : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; ‘मानकुराद’, कोकम, काजू, जायफळाच्या 8 नव्या जाती

‘आयसीएआर’च्या कृषी शास्त्रज्ञांचे प्रयत्न; विविध संस्थांसोबत 60 सामंजस्य करार
kaju
kajuDainik Gomantak
Published on
Updated on

जुने गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषद- केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्थेने यंदा नव्याने मानकुराद आंबा, कोकम, काजू आणि जायफळाच्या आठ जाती शोधल्याची माहिती संस्थेचे संचालक परवीन कुमार यांनी दिली आहे.

आयसीएमआर-सीसीएआरआयने (शनिवारी) आपला 34 वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी संस्थेचे  उपमहासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी, संचालक परवीन कुमार, कृषी संचालक नेव्हिल आल्फोन्सो आणि नाबार्डचे महाव्यवस्थापक मिलिंद भरुड हे उपस्थित होते.

संस्थेने 82 किनारी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध एनजीओ, संस्थांसोबत  60 सामंजस्य करार (मेमोरंड ऑफ ॲग्रीमेंट) केले आहेत. संस्था शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गोवा सरकारला मदत करण्यास सदैव तत्पर आहे,  असे डॉ. सुरेश कुमार चौधरी यांनी सांगितले.

kaju
Goa Black Panther : ...त्याच्यासाठी बाळ्ळीतील रात्र शेवटचा मुक्काम ठरली

संचालक परवीन कुमार म्हणाले,

तांदळाच्या प्रत्येकी चार, काजू बियाण्यांच्या चार,  वांग्याच्या सहा आणि चवळी अशा एकूण सतरा पिकांची वाण विकसित केली आहेत.

आयसीएमआर-सीसीएआरआयने कार्दोझ मानकुराद आंब्याची नोंदणी केली आहे. तसेच संस्थेने दोन एकात्मिक पीक पद्धती विकसित केल्या आहेत.

पशुविज्ञानामध्ये  संस्थेने अगोंडा डुक्कर आणि लार्ज व्हाइट यॉर्कशायर या डुकराच्या दोन प्रजाती विकसित केल्या आहेत.

संस्थेने  ‘कोकम’ साठीचे  ‘गोवा कोकम १’, ‘गोवा कोकम २’  आणि  ‘गोवा कोकम ३’  असे प्रस्ताव सादर केले आहेत.

काजूच्या दोन सुधारित जाती,  जायफळाच्या दोन जाती आणि  ‘मानकुराद’  आंब्याच्या एका जातीचाही प्रस्ताव तयार आहे. त्यामुळे या आठही वाणांना यंदा मंजुरी देऊन नोंदणी करण्यात येणार आहे.

kaju
Building Collapsed: म्हापशात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला; 3 मंजूर गंभीर जखमी

‘खाजन’  जमिनीचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आणि अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत आहे.  सध्या  ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’  साजरे करत असताना गोव्याला भरडधान्याची समृद्ध परंपरा आहे. कृषी विभाग रागी आणि नाचणी या पारंपरिक भरडधान्याची जास्तीत जास्त लागवड आणि उत्पादनासाठी कार्य करत आहे.

- नेव्हिल आल्फोन्सो, संचालक, कृषी संचालनालय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com