Bicholim Dainik Gomantak
गोवा

Gobi Manchurian Ban: डिचोलीत 'गोबी मंचूरियन'वरील बंदी ठरली यशस्वी, 'एफडीए'चा धसका

bicholim gobi ban: ''नवा सोमवार'' फेरीत उघड्यावर ‘गोबी मंचूरियन’ विक्री करण्यावर घातलेली बंदी यंदा यशस्वी झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: येथील ''नवा सोमवार'' फेरीत उघड्यावर ‘गोबी मंचूरियन’ विक्री करण्यावर घातलेली बंदी यंदा यशस्वी झाली.''एफडीए'' आणि पालिकेतर्फे कडक कारवाई होण्याची शक्यता गृहीत धरून यंदा ''नवा सोमवार'' उत्सवाच्या फेरीत ‘गोबी मंचूरियन’ खाद्यपदार्थ विकण्याचे धाडस संबंधित व्यावसायिकांनी केले नाही. त्यामुळे यंदा रात्रीपर्यंत ''नवा सोमवार''ला ''गोबी''चे स्टॉल दिसून आले नाहीत.

अन्न आणि औषध प्रशासनाने ''नवा सोमवार''च्या फेरीत उघड्यावर ‘गोबी मंचूरियन’ क्रीला बंदी आणली होती. ''गोबी''सह खाद्यपदार्थाचा परवाना नसलेल्या व्यवसायिकांना स्टॉल घालण्यास परवानगी देऊ नये, अशी सूचना ''एफडीए''ने डिचोली पालिकेला केली होती.

संबंधित व्यावसायिकांना याची माहिती मिळाल्यानंतर आणि यापुर्वी झालेली कारवाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी यंदा धोका पत्करला नाही. रात्री उशिरापर्यंत या व्यावसायिकांनी ‘गोबी मंचूरियन’ करण्याचे टाळले. गेल्या वर्षीही नवा सोमवारच्या फेरीत ‘गोबी मंचूरियन’ला बंदी घातली होती.

मात्र मध्यरात्रीनंतर ‘गोबी मंचूरियन’चा व्यवसाय तेजीत झाला होता. गेल्या दोन वर्षाप्रमाणे पुनरावृत्ती होता कामा नये. यासाठी ''एफडीए''ने कडक भुमिका घेतली होती. बंदी घालताना दंडात्मक कारवाई आणि साहित्य जप्त करण्याची तयारीही संबंधित यंत्रनेने ठेवली होती. एफडीए आणि पालिकेचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत फेरीवर लक्ष ठेवून होते.

‘गोबी मंचूरियन’ला बंदी घातल्याने ''नवा सोमवार''च्या फेरीत ते स्टॉल घालण्यात आले नाहीत. त्यामुळे खवय्यांना भेलपुरी आदी खाद्यपदार्थांवर रुच भागवावी लागली. ''गोबी'' नसली तरी अन्य खाद्यपदार्थ करून या व्यावसायिकांनी आपला गल्ला केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ पारंपरिक जागेत दरवर्षी चार ते पाच ‘गोबी मंचूरियन’चे स्टॉल दिसून येत होते. यंदा मात्र ते दिसून आले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajasthan vs Goa womens T20: गोव्याच्या महिला संघाचा विजय, 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात राजस्थानला नमविले

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

SCROLL FOR NEXT