Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: पावसाच्या सरींनी फुलली शेतकऱ्यांची आशा; डिचोलीत शेतीकामे सुरू, कृषी खातंही सज्ज

Bicholim Paddy Cultivation: उद्या करीत अखेर एकदाचा पाऊस सक्रिय झाल्याने, पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता सुखावला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली : उद्या करीत अखेर एकदाचा पाऊस सक्रिय झाल्याने, पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता सुखावला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे डिचोलीत सर्वत्र शेतीकामांना चालना मिळाली आहे.

अर्धाअधिक जून महिना कोरडा गेल्याने पावसाकडे डोळे लावून असलेले शेतकरीही आता मरगळ झटकून शेतीत उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. डिचोली हा कृषिप्रधान तालुका. तालुक्यातील साळ, मेणकुरे, धुमासे, लाटंबार्से, बोर्डे, मये, पिळगाव, नार्वेसह बहुतेक भागात दरवर्षी खरीप भातशेती लागवड करतात.

यंदाही शेतकरी खरीप भातशेती करण्याच्या तयारीत असताना मोसमी पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकरी विवंचनेत होते. सध्या जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी शेतीत उतरले आहेत. सध्या मयेसह पिळगाव आदी भागात नांगरणी आदी मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. यंदा भात लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी खातेही सज्ज झाले असून, अनुदान तत्वावर भातबियाणेही वितरीत करण्यात येत आहे.

पुढेही पाऊस हवा मुबलक

यंदा मॉन्सूनच्या सुरवातीलाच पावसाने दगा दिला. त्यामुळे जवळपास महिनाभर शेतीकामे लांबणीवर पडली आहेत. सध्या समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले. सध्याच्याप्रमाणे पर्जन्यवृष्टी होत राहिली, तर तरवा लावणीची कामे करण्यास मदत होणार आहे. पुढील आठ दिवसांनी या कामांना हात घालण्यात येणार आहे. पावसाने जर उपकार केले, तर यंदा भातपिकही समाधानकारक येणार, असा आशावाद मये येथील शेतकरी विश्वास चोडणकर आणि सखाराम पेडणेकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT