Bicholim Factory Explosion Dainik Gomantak
गोवा

Bicholim Factory Explosion : कारखाना मालकाला अटक करा; स्फोट प्रकरणी स्थानिकांत संताप

Bicholim Factory Explosion : या दुर्घटनेत कारखान्यातील मालमत्तेची हानी वगळता अन्य कोणतीच दुर्घटना घडली नसली, तरी स्फोटांच्या हादऱ्याने भयभीत झालेल्या जनतेचे भय मात्र अद्याप संपलेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Factory Explosion : 

डिचोली, पोलाद उत्पादन करणाऱ्या कारखान्यातील स्फोटांच्या दुर्घटनेनंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असली, तरी कारखाना परिसरात अजूनही भयावह स्थिती आहे.

या दुर्घटनेत कारखान्यातील मालमत्तेची हानी वगळता अन्य कोणतीच दुर्घटना घडली नसली, तरी स्फोटांच्या हादऱ्याने भयभीत झालेल्या जनतेचे भय मात्र अद्याप संपलेले नाही.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांसह आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी आज दुपारी कारखान्याला भेट देऊन दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूने संबंधित कारखान्याच्या मालकावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा. अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

वाठादेव-डिचोली येथील हा कारखाना सर्वांत जुना आहे. सुरवातीस ‘रोलिंग मिल’ या नावाने तो ओळखण्यात येत होता. कालांतराने या कारखान्याचे नाव बदलून ‘ऑरेंज फॉरेस्ट’ करण्यात आले. आता तर त्याचे ‘कैराव’ असे नामकरण करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणामुळे हा कारखाना वादात अडकला होता. धूर प्रदूषणामुळे त्रस्त नागरिकांनी कारखाना बंद ठेवणे भाग पाडले होते. नंतर उपाययोजना केल्यानंतर हा कारखाना पुन्हा सुरू झाला होता. आता कारखान्यात स्फोट झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुन्हा नोंद करण्याची मागणी

कालची दुर्घटनेमुळे कारखान्याचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीती उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. संबंधित मालकांविरूद्ध गुन्हा नोंदवून अटक करा, अशी मागणी वितेंद्र गोवेकर आदी नागरिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT