School Mobile Ban Dainik Gomantak
गोवा

Mobile Ban in School : ‘शांतादुर्गा’त मोबाईल बंदी; बंदीच्या निर्णयाला पालकांचाही पाठिंबा

व्यवस्थापनाचा निर्णय : डिचोलीतील पालकवर्गाकडून स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Mobile Ban in School : शाळांतून मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत असतानाच, डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे, व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे पालकांनीही स्वागत केले आहे.

सोमवारपासून (ता.१२) व्यवस्थापन मंडळाच्या या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना क्लासरूम किंवा शाळेच्या आवारात मोबाईल वापरता येणार नाही. शाळेत मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेणारे शांतादुर्गा उच्च माध्यमिक हे बहुधा राज्यातील एकमेव विद्यालय असू शकते.

शाळेत मोबाईल वापरावर बंदीच्या निर्णयाला पालकांचाही पाठिंबा आहे. मोबाईल बंदीमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता स्थिर राहण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ज्ञानार्जन करण्यास पोषक वातावरण निर्माण होणार आहे. या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, असे मत राजेश देसाई आणि अन्य काही पालकांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था

शाळेत मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली असली, तरी महत्त्वाच्या वेळी विद्यार्थी किंवा पालकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी शाळेत खास व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेत दूरध्वनी आणि मोबाईल सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. महत्त्वाच्या वेळी शाळेतील दूरध्वनी किंवा मोबाईल नंबरवरून विद्यार्थी आपल्या पालकांशी संपर्क साधू शकतात. पालकही याच नंबरवर आपल्या पाल्यांशी संपर्क साधू शकतात. वर्गात किंवा शाळेच्या आवारात एखादा विद्यार्थी मोबाईल वापरताना आढळून आल्यास कारवाईही करण्यात येणार आहे.

शिक्षण किंवा विधायक कार्यासाठी मोबाईलचा वापर आवश्यक असला, तरी अलीकडच्या काळात अधिकाधिक विद्यार्थी मोबाईलच्या विळख्यात अडकलेले आहेत. मोबाईलचा गैरवापरही होत आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शाळेत मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- विजय सरदेसाई, अध्यक्ष, शांतादुर्गा परिवार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT