Kudchire Youth Road Accident Dainik Gomantak
गोवा

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

Kudchire Youth Road Accident: दिवाळीच्या उत्साहात डिचोलीत घडलेल्या भीषण अपघातात कुडचिरे येथील तन्मय खरवत (२२) या युवकाचा मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: दिवाळीच्या उत्साहात डिचोलीत घडलेल्या भीषण अपघातात कुडचिरे येथील तन्मय खरवत (२२) या युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री श्री शांतादुर्गा विद्यालयासमोरील बगलमार्गावर हा अपघात घडला. तन्मयच्या मृत्यूमुळे कुडचिरे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय हा आपल्या स्कुटरवरून घरी जात असताना विद्यालयासमोरील बगलमार्गावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे स्कुटर रस्त्याच्या विभाजकाला धडकली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्याला तातडीने डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.

तन्मय हा डिचोली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) प्रशिक्षणार्थी होता. तसेच एका जिममध्ये अर्धवेळ प्रशिक्षक म्हणून काम करीत होता. त्याच्या वडिलांचे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम असून, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची माहिती मिळाली आहे. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डिचोली पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली मंदिर परिसरात कोसळली झाडाची फांदी, अनर्थ टळला; वीजखांब मोडला, अडीच तास वीजपुरवठा खंडित

Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी' कामांचे 'IPSCDL'कडून समर्थन; आरोप नव्हे, वस्तुस्थिती पाहा; 48 इलेक्ट्रिक बसेस, 362 'सीसीटीव्हीं'चा दाखला

Tuyem Hospital Issues: तुये इस्पितळातील समस्या तातडीने सोडवा, मांद्रे काँग्रेस गट समितीकडून आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर

FDA Raid: आरोग्याशी खेळ! इडली-सांबार, डोसा आणि मेदूवड्यासाठी दूषित पाण्याचा वापर; कळंगुटमध्ये 13 विक्रेत्यांवर 'एफडीए'ची कारवाई

Goa POCSO Court: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; बसचालकाला 13 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो न्यायालयाचा निकाल

SCROLL FOR NEXT