Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : तुळशी विवाहाची ‘लगीनघाई’; वृंदावने नटली नववधूप्रमाणे

Bicholim News : खरेदीला आलाय वेग : वृंदावने नटली नववधूप्रमाणे

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, ‘व्हडली दिवाळी’ अर्थात तुळशी विवाह कार्तिकी द्वादशीला म्हणजेच उद्या शुक्रवारी सर्वत्र साजरा करण्‍यात येणार आहे.

तुळशी विवाहाला अवघेच क्षण बाकी असल्याने सध्या डिचोलीत सर्वत्र या सोहळ्याची ‘लगीनघाई’ सुरु झाली आहे. तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्यही बाजारात दाखल झाले असून, खरेदीची लगबग सुरू झाली आहे. कार्तिकी द्वादशीपासून पाच दिवस तुळशी विवाह लावण्याची परंपरा असली तरी बहुतांश भागात कार्तिकी द्वादशीला तुळशीची लग्ने लावतात.

तुळशी विवाहानिमित्त तुळशी वृंदावने नववधूप्रमाणे सजू लागली आहेत. घरोघरी तुळशी वृंदावनांना नवा साज येऊ लागलाय. तुळशीवृंदावने रंगविण्याचे काम जोरात सुरू आहे. काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. सिमेंटच्या रेडिमेड तुळशीही बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत.

साहित्य बाजारात दाखल

तुळशी विवाह म्हटल्याबरोबर विवाहासाठी ऊस, चिंच, आवळे, दिणा आदी पारंपरिक साहित्य आवश्यक असते. हे साहित्य आता बाजारात दाखल झाले आहे. कर्नाटक भागातून ऊसही दाखल झाला आहे. उद्या शुक्रवारी खरेदीला आणखी जोर येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंच, आवळ्याची फांदी महाग आहे. आवळ्यांचा तर तुटवडा जाणवतोय. तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य ग्रामीण भागात सहज उपलब्ध होत असते. तरीसुद्धा एकाच ठिकाणी सर्व साहित्य मिळत असल्याने बाजारात या साहित्याला प्रचंड मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT