Film Festival Goa 2023 : ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ उद्या झळकणार!

Film Festival Goa 2023 : पोस्टरचे अनावरण : सलग तिसऱ्या वर्षी कोकणी लघुपटाची निवड
 'Peace Lily Sand Castle
'Peace Lily Sand CastleDainik Gomantak
Published on
Updated on

Film Festival Goa 2023 : पणजी इफ्‍फीतील गोवन स्टोरीज  विभागात निवडलेल्या गेलेल्या सात सिनेमांची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती.

त्यातील ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ या लघुपटाचे प्रदर्शन दि. २५ नोव्हेबर रोजी सकाळी ९ वाजता आयनॉक्स ऑडी : ३ मध्ये होत आहे. प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपथी यांनी नुकतेच या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करत लघुपटाला शुभेच्छा दिल्या. 

सहित स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ हा कोकणी लघुपट एक वेगळाच प्रयोग म्हणता येणार आहे. गेल्या दोन वर्षात सहित स्टुडिओच्या ‘कुपांचो दर्यो’ आणि ‘अर्दो दिस’ या दोन लघुपटांनंतर आता ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ची निवड सलग तिसऱ्या वर्षी होत आहे.

हा लघुपट म्हणजे गेल्या दोन सिनेमांचा पुढील भाग म्हणजेच लघुपट त्रयी म्हणता येईल. लघुपटांमध्ये अशाप्रकारे सिनेत्रयी साकारण्याची ही पहिलीच वेळ मानले जाते. 

अगोदरच्या दोन भागांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता तिसऱ्या भागात जॉय आणि मानवी यांचे आयुष्य कोणत्या वळणावर येऊन ठेपले आहे, याचे कुतूहल प्रेक्षकांमध्ये आहे.  किशोर अर्जुन यांच्या सहित स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’चे दिग्दर्शन हिमांशू सिंह यांनी केले आहे.

 'Peace Lily Sand Castle
Goa Petrol-Diesel Prices: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांमध्ये घट, दक्षिण गोव्यातील किंमतीत वाढ

सलग तीन वर्षे सहित स्टुडिओचे कोकणी लघुपट इफ्‍फीच्‍या मंचावर निवडले जात आहेत. यानिमित्ताने कोकणी सिनेसृष्टीत प्रथमच आम्हाला अस्स्सल ‘गोवन सिनेत्रयी’ घेऊन येण्याची संधी मिळते आहे. ही आमच्यासाठी आनंदाची आणि उत्साहाची बाब आहे. ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ हा आमचा असाच एक प्रयत्न आहे. कुपांचो दर्यो, अर्दो दिस या आमच्या अगोदरच्या दोन लघुपटांना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद यावेळीही मिळेल.

- किशोर अर्जुन, सहित स्टुडिओ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com