Bhatgram Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Bhatgram Mahotsav: 5 वर्षांनंतर डिचोलीत 'भतग्राम महोत्सवाचे' आयोजन, अनेक कार्यक्रमांची रेलचेल; कलाकारांचा होणार सत्कार

Bhatgram Festival Goa: पाच वर्षांच्या खंडानंतर डिचोली नगरीची सांस्कृतिक ओळख करुन देणारा ''भतग्राम महोत्सव'' यंदा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

Bhatgram Mahotsav Goa 2025

डिचोली: पाच वर्षांच्या खंडानंतर डिचोली नगरीची सांस्कृतिक ओळख करुन देणारा ''भतग्राम महोत्सव'' यंदा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. डिचोली बचाव अभियानतर्फे आयोजित हा महोत्सव येत्या १ आणि २ मार्च असे दोन दिवस छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्या निवडण्यात आल्या आहेत. डिचोली बचाव अभियानचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेश सावळ यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत या महोत्सवाची माहिती दिली.

यावेळी उपाध्यक्ष गोपाळ मोरजकर, खजिनदार डॉ. रामा गावकर, संयोजक प्रसाद नाईक, सचिव किरण गोवेकर, कार्याध्यक्ष मिलिंद तेली, संतोष आमोणकर, महेश्वर परब, दिलीप वरक, निशांत चणेकर, श्रीपाद कुंभारजुवेकर आदी उपस्थित होते.

शनिवारी (ता. १) सायंकाळी ६.३० वा. कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार जीत आरोलकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता. २) सायंकाळी होणाऱ्या समारोप सोहळ्यास पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांच्यासह माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सभापती राजेश पाटणेकर उपस्थित राहणार आहेत.

अन्न महोत्सव!

‘भतग्राम’निमित्त अन्न महोत्सवही साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवठिकाणी विविध महिला गटांतर्फे स्टॉल थाटण्यात येणार असून, या स्टॉलवर पारंपरीक खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती नरेश सावळ यांनी दिली. ‘बॉम्बे म्युझिकल नाईट’ हा कार्यक्रम या सोहळ्याचे आकर्षण आहे. ''सूर नवा ध्यास नवा'' फेम रवींद्र खोमणे, पार्श्वगायिका अक्षता सावंत आणि मिमिक्री कलाकार राहूल कदम आदी कलाकार कला पेश करणार आहेत. शाळांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT