Bicholim Gomantak Digital News
गोवा

Bicholim News : डिचोलीत विकासकामांचा शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : डिचोली मतदारसंघात सध्या विकासकामांचा धडाका सुरू आहे. शनिवारी (ता.१) शहरासह पाच ठिकाणी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते पाच ठिकाणी विकास प्रकल्प, कामांचा शुभारंभ करण्यात आला. अडवलपाल पंचायत क्षेत्रातील भटाचोबांध-खोटवायंगण येथे बंधारा बांधण्यात येणार आहे.

स्थानिक सरपंच सुबत्ता सामंत, उपसरपंच विनश्री गावकर, पंच गीतेश गडेकर, गजानन पालकर शेखर परवार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार डॉ. शेट्ये यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता के. पी. नाईक उपस्थित होते.

बगलमार्गाचे रुंदीकरण

मुळगाव मुख्य रस्ता ते श्री नागदेवता मंदिरपर्यंतच्या बगलमार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा आमदार डॉ. शेट्ये यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

नानोड्यात रस्त्याची दुरुस्ती

लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा येथील रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण कामाचा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, सरपंच पद्माकर मळीक अन्य पंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

एमडीआर जंक्शन ते नागीलकुडापर्यंत नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. या कामाचाही आमदारांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच यांच्यासह मोनू घाडी उपस्थित होत्या.

बोर्डे येथे गटार बांधकाम

डिचोली पालिका क्षेत्रातील व्होडप-बोर्डे येथे गटार बांधण्यात येणार आहे. नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या उपस्थितीत आमदार डॉ. शेट्ये यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. स्थानिक नगरसेवक ॲड. रंजना वायंगणकर, दीपा पळ आणि अनिकेत चणेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT