Goa Beach Watersports: जलक्रीडा समस्यांवर आज मुख्यमंत्री करणार चर्चा!

राज्‍यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर जलक्रीडांमध्‍ये पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत.
Goa Government| CM Pramod Sawant | Goa Beach Watersports
Goa Government| CM Pramod Sawant | Goa Beach WatersportsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beach Watersports: जलक्रीडा हा पर्यटनाचाच एक भाग होऊन बसला आहे. राज्‍यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर जलक्रीडांमध्‍ये पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारने त्यात सुसूत्रता आणण्यासाठी अनेक उपाययोजना मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र काही जलक्रीडा व्यावसायिकांचा त्‍यास विरोध आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्या सोमवारी संबंधीतांशी चर्चा करणार असल्‍याचे समजते. या चर्चेवेळी किनारपट्टीतील सर्व आमदारांसह जलक्रीडा व्यावसायिक, पर्यटनाशी संबंधितांनाही आमंत्रित करण्‍यात आले आहे.

Goa Government| CM Pramod Sawant | Goa Beach Watersports
Goa Employment: कलाकारांनाही सरकारी नोकऱ्या द्या; युरी आलेमाव यांची मागणी

जलक्रीडांमध्ये शिस्त आणण्यासाठी सरकारने गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडवर जबाबदारी सोपविली आहे. जलक्रीडा व्यावसायिकांनी जीईएलकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

जीईएलचे अधिकारी व कर्मचारी पोलिस संरक्षणात किनाऱ्यांवरील जलक्रीडेची देखरेख करीत आहेत. नेमके हेच जलक्रीडा व्यावसायिकांना नको आहे.

त्यांच्या मते सरकार जलक्रीडा उद्योगाला खासगी स्वरूप आणू पाहत आहे. सरकारने किंवा जीईएलने जलक्रीडा व्यवसाय वाढीस लावण्यास काहीच योगदान दिलेले नाही. जे पारंपरिक मच्छीमार आहेत, त्यांनी जलक्रीडा व्यवसायाला चालना दिली आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, जलक्रीडा तसेच शॅक्‍सव्यावसायिक एकत्र आले असून त्यांनी एकत्र लढण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती अखिल गोवा शॅक्‍समालक सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com