Goa Job Scam प्रकरणाची चौकशी करा

 

Dainik Gomantak

गोवा

Goa Job Scam प्रकरणाची चौकशी करा

नोकर भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी सखोल चौकशी करावी

दैनिक गोमन्तक

डिचोली: राज्यात (Goa) सध्या गाजत असलेल्या कथित 'जॉब स्कॅम' (Job Scam) प्रकरणाची चौकशी करा. अशी डिचोली गट काँग्रेसतर्फे (Congress) करण्यात आली असून, तसे निवेदनही काँग्रेसतर्फे डिचोली पोलिसाना दिले आहे. अलीकडेच काँग्रेस प्रवेश केलेले महेश महांबरे यांच्या नेतृत्वाखाली मनोज नाईक, फिरोज बेग आणि मुस्तफा बेग यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने डिचोली पोलिस (Bicholim Police) स्थानकात जाऊन हे निवेदन दिले. नोकर भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी सखोल चौकशी करावी. अशी मागणी महेश महांबरे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केली.

चौकशीस टाळाटाळ

सार्वजनिक बांधकाम खात्यात पैशांची लाच घेऊन नोकर भरती झाली असून, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. असा आरोप दोन दिवसांपुर्वी पणजीचे आमदार बाबूश मोंसेरात यांनी केला आहे. हा घोटाळा त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. मात्र या प्रकरणी पुढील कोणतीच चौकशी करण्यात आलेली नाही. त्याबद्दल महांबरे यांनी नाराजी व्यक्त करून याप्रकरणाची दक्षता खात्यातर्फे चौकशी करावी. अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT