Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीतील गाडेधारक वाऱ्यावर, आठजणांवर संकट; स्थलांतरित केलेल्या जागेत स्टॉल थाटण्यास मज्जाव

Bicholim Market: डिचोली बाजारातील ‘त्या’ जीर्ण व धोकादायक जिन्याखालील स्टॉलधारकांना हटविण्याची मोहीम पालिकेने शुक्रवारपासून हाती घेतली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: बाजारातील ‘त्या’ जीर्ण व धोकादायक जिन्याखालील स्टॉलधारकांना हटविण्याची मोहीम पालिकेने शुक्रवारपासून हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत सायंकाळी तीन स्टॉल हटवून त्यांना सार्वजनिक गणपती पूजन मंडपात स्थलांतरित करण्यात आले.

मात्र, गणपती पूजन मंडपात स्टॉल थाटण्यास गणेशोत्सव मंडळाने हरकत घेतल्याने हे स्टॉलधारक सध्या वाऱ्यावर पडल्यात जमा झाले आहेत.

गणपती पूजन मंडपात स्टॉल घालण्यास हरकत घेतल्यानंतर अस्वस्थ झालेल्या स्टॉलधारकांनी अखेर आपले साहित्य पुन्हा पूर्वीच्याच जागेत आणून ठेवले. पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत सध्याची जागा सोडायची नाही, असा पवित्रा या स्टॉलधारकांनी घेतला आहे. त्यामुळे या प्रश्नावरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याप्रकरणी पालिका आता कोणती भूमिका घेते, याकडे बाजारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

जीना कोसळण्याच्या अवस्थेत

धोकादायक जिन्याखाली दोन्ही बाजूंनी मिळून आठ स्टॉल आहेत. जवळपास ४४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पालिकेच्या पहिल्या बाजार प्रकल्पासाठी दोन्ही बाजूंनी जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र, चौथ्या टप्प्यातील मार्केट प्रकल्पाला लागून असलेला ‘जीना’ आता अत्यंत जीर्ण झाला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी लोखंडी ‘जीना’ बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी अधिकाऱ्यांसह संबंधित जिन्याची पाहणी केली होती.

स्टॉलधारकांची धावपळ

जिन्याखाली नोटीस लावून शुक्रवारी सायंकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी साहित्य हटविण्याचे आदेश स्टॉलधारकांना दिले व स्टॉल काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्टॉलधारकांची धावपळ सुरू झाली. तीन स्टॉलधारकांनी आपले साहित्य गणपती पूजन मंडपात स्थलांतरित केले.

दरम्यान, गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती पूजन मंडपात ठेवलेले साहित्य हटविण्यास संबंधित स्टॉलधारकांना भाग पाडले. तोपर्यंत पालिकेचे अधिकारी व कर्मचारी निघून गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT