Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Bus Station : डिचोली बसस्थानकावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू; प्रवाशांमध्ये समाधान

Bicholim Bus Station Road Patholes : या खड्ड्यांमुळे बसगाड्यांच्या सुट्या भागांची मोडतोडही होत होती. तशी खंतही बसचालक व्यक्त करीत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, बसस्थानकावरील खड्डे बुजविण्याचे काम अखेर आजपासून (सोमवारी) हाती घेण्यात आले आहे. खड्डे बुजविण्यात येत असल्याने बसचालकांसह प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील तात्पुरत्या बसस्थानकावर सध्या लहान-मोठे खड्डे पडल्यामुळे बसस्थानकाची दुर्दशा झाली आहे. प्रवासी बसगाड्या आत आणि बाहेर घेतात, त्या भागात लहानसहान खड्डे पडल्याने प्रवासी बसवाल्यांसाठी डोकेदुखी बनली होती.

बसगाड्या आत घेताना बसचालकांना कसरत करावी लागत असे. प्रवाशांना तर गचक्यांचा अनुभव येत होता. या खड्ड्यांमुळे बसगाड्यांच्या सुट्या भागांची मोडतोडही होत होती. तशी खंतही बसचालक व्यक्त करीत होते.

सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे जोरदार पाऊस पडला, की खड्डे पाण्याने पाण्याने भरत होते. बसगाड्या आतबाहेर घेताना खड्ड्यांतील चिखलमय पाणी प्रवाशांवर उसळत असे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असे.

आमदारांच्या निर्देशानंतर दुरुस्ती

आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत गेल्या शनिवारी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सरकारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. पावसाळ्यातील समस्या सोडवा, असे निर्देश आमदारांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यांच्याच निर्देशानुसार ‘पीडब्ल्यूडी’च्या रस्ता विभागातर्फे दगड आणि माती घालून खड्डे बुजवल्यानंतर ‘जेटपॅचर’द्वारे डांबरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

SCROLL FOR NEXT