Bicholim Bus Stand Inauguration Dainik Gomantak
गोवा

Bicholim Bus Stand: डिचोली बसस्थानकाचे चालू महिन्‍यातच लोकार्पण! 4 वर्षांची प्रतीक्षा संपणार; भर पावसातही काम युद्धपातळीवर सुरू

Bicholim Bus Stand Inauguration: गेली जवळपास चार वर्षे रखडलेल्या येथील अत्याधुनिक बसस्थानक प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: गेली जवळपास चार वर्षे रखडलेल्या येथील अत्याधुनिक बसस्थानक प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पावसातही काम युद्धपातळीवर सुरू असून चालू महिन्‍यातच त्‍याचे लोकार्पण होण्‍याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या उद्‌घाटनाची डिचोलीवासीयांसह प्रवाशांनाही उत्सुकता लागली आहे.

या बसस्थानकाचे लोकार्पण मे महिन्यात करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र अंतिम टप्प्यातील काही कामे शिल्लक राहिल्याने उद्‌घाटन पुढे ढकलावे लागले. तरीही सध्या कामाचा वेग वाढविण्यात आला असून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये वेळोवेळी पाहणी करून प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे सुमारे १७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जात आहे. एप्रिल २०२२ मध्ये कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला पावसाळ्यात जमिनीतून पाणी झिरपणे तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे कामाचा वेग मंदावला आणि प्रकल्प रखडला.

या असतील प्रमुख सुविधा

तळमजल्यावर व्यापारी गाळे.

पहिल्या मजल्यावर आरटीओ कार्यालय.

दुसऱ्या मजल्यावर चालक-वाहकांसाठी विश्रांती कक्ष व सभागृह.

प्रवाशांसाठी आराम कक्ष, वाचनालय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT