

मडगाव: जम्मू-काश्मीर येथे ६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २९व्या मुलांच्या-मुलींच्या सबज्युनियर सेपॅक टाकरो राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्याचे दोन्ही संघ रवाना झाले.
भारतीय सेपॅक टाकरो महासंघाचे अध्यक्ष बाबू कवळेकर आणि महासंघाचे माजी अध्यक्ष एस. आर. प्रेमराज यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच संतोष पाटील, राष्ट्रीय पंच यशोधन खराडे आणि अरविंद चव्हाण उपस्थित होते. गोव्याची सेपॅक टाकरोमधील अव्वल संघांमध्ये गणना होत असून, दोन्ही संघ जम्मू-काश्मीरमध्ये पदकांची कमाई करतील, असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.
गोव्याचे संघ असे...
मुलांचा संघ : आदित्य (कर्णधार), फ्लान्सियो (उपकर्णधार), अभिषेक, आशिष, श्रेयांश, अश्वन, ऋतिक, इर्फान.
मुलींचा संघ : जान्सिया (कर्णधार), सीवा (उपकर्णधार), तन्वी, श्रुती, द्वितिका, आर्या, सकिना यांचा समावेश आहे.
रेश्मा या मुलांच्या संघाच्या तर लेहला गोम्स या मुलींच्या संघाच्या प्रशिक्षक आहेत. कोज्मी फेर्रांव संघाचे व्यवस्थापक आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.