Dr. Bhagyashree Shetye Cultural Club celebrates its anniversary with excitement Gomantak Digital Team
गोवा

Bicholim : महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी - डॉ. भाग्यश्री चंद्रकांत शेट्ये

डॉ. भाग्यश्री शेट्ये : व्हाळशी सांस्कृतिक क्लबचा वर्धापनदिन उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim : आज प्रत्येक क्षण आव्हानात्मक आहे. समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करतानाच, महिलांनी स्वतःसाठी थोडा तरी वेळ द्यावा. कुटुंबाची काळजी घेताना, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत डॉ. भाग्यश्री चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले.

व्हाळशी सांस्कृतिक क्लबच्या वर्धापनदिन सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलत होत्या. श्री तळेश्वर देवस्थानच्या सभागृहात आयोजित या सोहळ्याप्रसंगी नगरसेवक विजयकुमार नाटेकर, क्लबचे अध्यक्ष निलेश काजारी, गुरूदास गाड, दिशा काजारी,मनोज परब आणि प्रेमानंद डिचोलकर उपस्थित होते. विजयकुमार नाटेकर यांनीही विचार मांडले. निलेश काजारी यांनी स्वागत केले. निशा वाळवे यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश परब यांनी आभार मानले.

कार्व्हिंग, प्रश्नमंजूषा स्पर्धा

वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त महिलांसाठी फळ-भाजी कार्व्हिंग आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. फळ-भाजी कार्व्हिंग स्पर्धेत दीप्ती चडीचल हिने प्रथम बक्षीस पटकावले. द्वितीय बक्षीस दर्शना परब तर तृतीय बक्षीस कविता काजारी हिला प्राप्त झाले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सपना काजारी आणि काजारी जोडी विजेती ठरली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT