Women's Health Awareness : म्‍हापशात मासळी विक्रेत्या महिलांमध्‍ये आरोग्य जागृती

आपल्‍या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखून निरोगी जीवन जगा, असे आवाहन केंद्राच्या अधिकारी डॉ. शेरल डिसोझा यांनी केले.
Women's Health Awareness
Women's Health Awareness Gomantak Digital Team
Published on
Updated on

Women's Health Awareness : म्हापसा येथील मासळी विक्रेत्या महिलांना विविध आजारांची माहिती देऊन म्हापसा नागरी आरोग्य केंद्रातर्फे जनजागृती करण्यात आली. आपल्‍या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखून निरोगी जीवन जगा, असे आवाहन केंद्राच्या अधिकारी डॉ. शेरल डिसोझा यांनी केले.

म्हापसा मासळी मार्केटमध्ये झालेल्‍या या कार्यक्रमाला मासळी विक्रेता संघटनेच्या अध्यक्षा शशिकला गोवेकर, डॉ. ऊर्वी फडते, अपर्णा कारापूरकर, स्वच्छता अधिकारी महेश विर्नोडकर, माया गावस, गोविंद पेडणेकर पुरूष उपस्थित होते.

Women's Health Awareness
Breast Cancer: सावधान! गोव्यात स्तन कर्करोगाचे वाढतेय प्रमाण

डॉ. शेरल डिसोझा यांनी सांगितले की, डासांपासून होणाऱ्या आजारातील मलेरिया व डेंग्यू हे प्रमुख असे रोग आहेत जे आम्ही आवश्यक खबरदारी घेऊन दूर ठेवू शकतो. थंडी, ताप झाल्यास लगेट डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. आरोग्य केंद्रात रक्तचाचणीा करावी. आम्‍ही सर्वांनी कोरोनाचा अनुभव घेतलेला आहे. ही महामारी अजून पूर्णत: संपुष्टात आलेली नाही. त्‍यामुळे काळजी घेणे गरजेची आहे.

Women's Health Awareness
Garbage awareness : फोंडा शहरात कचराप्रश्नी जागृती मोहीम...

राज्‍यात कर्करोग रुग्‍णांचे प्रमाण देखील वाढलेले आहे. स्तन कर्करोगाचे लवकर निदान व्हावे यासाठी सरकारने मोहीम राबविली असून महिलांनी त्‍याचा लाभ घेतला पाहिजे. सरकारने दिलेल्या सुविधांचा उपयोग करून घेतला तर वेळीच उपचार करणे शक्य होते. मधुमेह, रक्दाब व हृदयविकार हे रोगही झपाट्याने वाढत आहेत. लहान वयातही हे आजार होतात. त्यामुळे आपल्या आरोग्‍याची तपासणी वेळोवेळी करून रोगमुक्त व्हा.

- डॉ. शेरल डिसोझा, म्‍हापसा आरोग्‍य केंद्राच्या अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com