Amthane Dam Gomantak Digital
गोवा

Bicholim Amthane Dam : मगरींमुळे आमठाणे धरण पर्यटनासाठी बनले असुरक्षित

आणखी बळी नकोत : प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेले डिचोलीतील आमठाणे धरण असुरक्षित बनले आहे. मागील चार वर्षांपासून धरणात मगरींचा संचार वाढला आहे. अडीच वर्षांत मगरींच्या हल्ल्यामुळे धरणात पर्यटकांसह दोघांचे बळी गेल्याने सुरक्षिततेचा प्रश्‍‍न ऐरणीवर आला आहे. धरणस्थळी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

जलस्रोत खात्यातर्फे धरणाचा पर्यटनात्‍मकदृष्ट्या विकास करण्यात येणार असून, सध्या हे काम सुरूही आहे. मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्र ग्रामीण भागात येत असले तरी परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेण्‍यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची या धरणावर ये-जा सुरूच असते. सुट्यांच्या दिवशी तर खास करून तरुणाईची वर्दळ असते.

पर्यटकांसह दोघांचे बळी

  • शनिवारी मगरीच्या हल्ल्यात स्थानिक संगीता शिंगाडी या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेपूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 2021 या दिवशी या धरणात मगरीच्या हल्ल्यात जितूकुमार या राजस्थानमधील पर्यटक युवकाचा बळी गेला होता.

  • राजस्थानमधील मित्रांचा एक गट नववर्ष साजरे करण्यासाठी आमठाणे धरणावर आला होता. या गटात पाचजण होते. पैकी तिघेजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता, जितूकुमार याच्यावर मगरीने हल्ला करून त्याला खोल पाण्यात ओढून नेले होते. त्यातच त्याचा बळी गेला होता.

... तर चुकीचा संदेश पसरण्‍याची भीती

आमठाणे धरण हे पर्यटन क्षेत्र म्‍हणून नावारूपाला आले आहे. मगरीच्‍या हल्‍ल्‍यात महिलेचा मृत्‍यू झाल्‍याने पर्यटकांची संख्‍या घटूही शकते. गोवा हे पर्यटनाला प्रोत्‍साहन देणारे राज्‍य आहे. पर्यटन सुलभ सोयींसाठी सरकार नेहमी प्रयत्‍नशील असते. आमठाणे येथे वेळीच सुरक्षिततेच्‍या दृष्टिकोनातून उपाय न योजल्‍यास त्‍यातून चुकीचा संदेश पसरण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

तो भाग खुलाच

आमठाणे धरणात मगरींचा संचार असल्याची सूचना देणारे फलक जलस्रोत खात्यातर्फे धरणकाठी लावण्यात आलेले आहेत. मात्र, या धरणाला भेट देणारे बहुतेक पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. बरेचजण धरणातील पाण्यात उतरून जल पर्यटनाची मजा लुटतात. या धरणाच्या सभोवतालचा भाग उघडा आहे. त्यामुळे लोकांसह गुरांना पाण्यात उतरणे सोपे होते. या धरणात मगरींच्या हल्ल्यात काही गुरांचेही बळी गेले आहेत.

आमठाणे धरणाचा पर्यटनदृष्ट्या विकास होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. धरणस्थळी सूचना फलक लावले असले तरी या धरणातील मगरींचा धोका ओळखून आवश्यक उपाययोजना करावी. मानव आणि प्राण्यांचे बळी रोखण्यासाठी धरणाच्या सभोवताली रेलिंग करावे. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी.

दिलीप वरक, पंचसदस्य, सावरधाट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT