धक्कादायक! चार वर्षात मुंबई आणि गोव्यात समुद्रमार्गे पाठवले तब्बल 2400 कोटींचे अमली पदार्थ

ग्रेटर नोएडा येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
Drugs worth 2400 crores were sent by sea in 4 years to Mumbai and Goa
Drugs worth 2400 crores were sent by sea in 4 years to Mumbai and GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Drugs worth 2400 crores were sent by sea in 4 years to Mumbai and Goa: ग्रेटर नोएडा येथील सूरजपूर कोतवाली परिसरात ड्रग्ज फॅक्टरीतून काही डायरी जप्त करण्यात आल्या असून, त्यातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या कारखान्यात बनवलेले एमडीएमए अमली पदार्थही मुंबई आणि गोव्याला सागरी मार्गाने पाठवले जात असल्याची माहिती पोलिसांना या डायरीतून मिळाली आहे.

ग्रेटर नोएडा ते वडोदरा या रस्त्याने जाणारे अमली पदार्थ तेथून मुंबई आणि गोव्याला समुद्रमार्गे पुरवले जात होते. गेल्या चार वर्षांत ग्रेटर नोएडामध्ये बनवलेल्या 2,400 कोटी रुपयांच्या ड्रग्जचा पुरवठा मुंबई आणि गोव्यात करण्यात आला आहे. अशी माहिती या डायरीतून समोर आली आहे.

दरम्यान, यामुळे देशात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. गुजरातमधील वडोदरा येथील सावली तालुक्यातील मोजी गावात आरोपींनी अमली पदार्थाचे मोठे गोदाम उभारले होते. ग्रेटर नोएडा येथून पुरवल्या जाणाऱ्या अमली पदार्थाचा साठा इतर अनेक राज्यांमध्येही सापडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Drugs worth 2400 crores were sent by sea in 4 years to Mumbai and Goa
स्वत:च्या मालमत्तेत धार्मिक कार्यास मनाई मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; शिवोलीच्या 'त्या' चर्चवरील बंदी उठली

ग्रेटर नोएडाच्या सेक्टर थेटा II मध्ये असलेल्या तीन मजली घरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ कारखान्याचा 16 मेच्या रात्री पोलिसांनी पर्दाफाश केला. घटनास्थळावरून नऊ आफ्रिकन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 46 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 300 कोटी रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी पहिल्यांदाच अमली पदार्थांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी गेल्या एक वर्षापासून कारखाना चालवत होते. कारखाना प्रयोगशाळेच्या पद्धतीने चालवला जात होता.

अनुदुम इमॅन्युएल, जोकू उबाका, डॅनियल अजुह, ड्रॅमंड, लिवी जू, जेकब एमिली, कोफी, चिडी झियाग्वा, जोकू लेची (सर्व रा. नायजेरिया) असे अटक आरोपींची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com